पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )

वयाच्या १०७ व्या वर्षी - मृत्यू पावला. सुलतान महमूदनंतर त्याचा विषयी, व्यसनी, व रंगेल स्वभावाचा मुलगा फिरोजशहा हा गादीवर आला व त्याच्यानंतर, महंमद चल्ली, ( कारकीर्द इ० सन १४२२ - १४३५ ) अल्लाउद्दीनशहा, ( कारकीर्द इ० सन १४३५ - १४५७ ) हुमायूनशहा, ( कारकीर्द इ० सन १४५७ – १४६१ ) " जालिम " निजामशहा ( कारकीर्द इ० सन १४६१ – १४६३ ) व महंमदशहा दुसरा (इ० सन १४६३ ते ३० सन १४८२ ) हे अनुक्रमें गादीवर आले. त्यांपैकी अल्ला- उद्वीन शहाच्या कारकीर्दीत खाजेखान महंमद गवान या नांवाचा एक मनुष्य त्याच्या दर- बारी सरदार हाणून उदयास आला, आणि फक्त दक्षिणेतीलच नव्हे तर हिंदुस्था- नांतील मुसलमानी राज्यांतील एक अद्वितीय मुत्सद्दी योद्धा व महाविरक्त साधुपुरूष ह्मणून भावी काळात त्याची अतीशय प्रसिद्धी झाली. या थोर पुरुषासारखे अलौकिक पुरुष हिंदू अथवा मुसलमान राज्यांत क्वचितच निर्माण झालेले असल्यानें त्याच्या- संबंधों त्रोटक हकीकत याठिकाणी प्रथित करणे आवश्यक आहे.

 ख्वाजा महंमदगवान याचे वाडवडील इगणदेशांतील गिलन येथील राजांच्या वजिराच्या कामावर फार दिवसांरासून होते. पुढे गवानच्या घराण्यांतील एका पुरुषास (Rushd) येथील राज्य प्राप्त झाल्यावर त्याचा जन्म झाला. हे राज्य या घराण्याकडे इराणचा राजा शहा तहमा याच्या काळापर्यंत चालले; या शहाच्या मनांत गवानविषयीं वैषम्य उत्पन्न झाल्यामुळे तो आपणास दगा करील अशी त्यास भीति वाटू लागली; ह्मणून तो स्वदेश सोडून व्यापार करण्याच्या उद्देशानें बाहेर पडला. त्यानें पुष्कळ देशांत प्रवास केला, आणि त्या त्या देशातील प्रसिद्ध व विद्वान् मंडळींचा त्याने परिचय करून घेतला. नंतर आपल्या वयाच्या ४३ व्या वर्षी, दक्षिणेतील विद्वान् लोकांच्या भेटी घेण्याकरितां व व्यापाराकरितां तो दाभोळ बंदरांत येऊन उतरला आणि तेथून पुढे दिल्ली येथें जाण्याच्या इरायानें बेदर येथें आला. यावेळीं अल्लाउद्दीन दुसरा हा गादीवर होता. त्यानें गवानच्या आंगीं वसत असलेल्या अनेक अलोकिक गुणांची पारख करून त्यास आपल्या पदरी सरदाराची जागा दिली; व पुढे हुमायूनशहा यानें आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभीच इ० सन १४५७ मध्ये आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणें महंमद गवान यास " मलिक-उत्त-तुजार " असा किताब देऊन त्याची मुख्य वजिराच्या जागेवर नेमणूक केली. नंतर हुमायूनचा मुलगा निजामशहा याच्या कारकीर्दीतही तो वजीरपदावर असून त्याच्याच सल्ल्यानें शहा नेहमीं राज्यकारभार चालवीत असे. या शहाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ महमदशहा दुसरा हा इ० १४६३ सन मध्ये अगदीं अज्ञान ह्मणजे नऊ वर्षाचा असतां गादीवर आला. या शहाच्या