पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भागाईत छ २७ माहे शौर्वल मंदवार पावेतों औरंगाबादेस स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. विशेष. राजश्री नारो शंकर याजकडून रा॥ बाळाजी महादेव खजाना घेऊन येत होते. त्यास ब-हाणपुरी अबदुल खैरखान याणी खजाना अटकाविला. तें वृत्त सविस्तर पूर्वी विनंतिपत्री लिहिले आहे त्यावरून कळों येईल. त्याउपर नसीरजंग यास सेवकानें चार गोष्टी सांगणे त्या सांगोन याजकडून रायनथमल याप्त राजे रघुनाथदास यांजकड़े पाठविले आणि त्यास आपले घरी बोलाविले. त्यावरून छ २६ रोजी राजाजी नमीरजंग याचे घरी आले. उभयतांचे भाषण होऊन त्यांनी सेवकास व रा॥ राघो गणेश यांस बोलाऊं पाठविले. नसीरजंग याणी राजाजीस सांगितले की तुहास आपणाकडून बिगाडाची शुरुवात करणे असेल तर हे कर्म सुखरूप करणे; नाही, तेव्हां गोष्ट कार्याची नाही. त्यावरून राजाजी ह्मणों लागले की, आहाासहि आधीं आपणाकडून अंतर पाडणे नाही. त्याजकडूनच हरयेक विशईं जाजती होत्ये. खजान्याचे कामाची इतल्ला अबदुल खैरखान यांणी आमास दिधली नसतां बेजा केले. याउपर त्यास माकूल करून लिहोन खजाना वगैरे परतोन देवितों, याप्रकारे निश्चय होऊन त्यांणी सांडणीस्वार ब-हाणपुरास ताबडतोब रवाना केला व आमास आज्ञा केली की तुह्मी श्रीमंतास लिहिणे. त्यावरून राजेश्री राघोपंत यांणी सविस्तर सेवेसी विनंतीपत्र लिहिले आहे. सेवकास वकालतीचे जाबसाल लिहावयास प्रयोजन नाही. परंतु नसीरजंग यांस व राजाजीस लतीला १७५१ च्या सप्टंबरांत पुन्हां प्रारंभ झाला. ह्या वेळी लढाईला प्रथम कारण निजामाकडूनच झाले. ह्या कारणाचा उल्लेख ग्रांटडफनें केला नाही. नारो शंकराकडील खजाना बहाणपुरी आला असतां तो अबदुलखैरखान याच्या हस्तें राजा रघुनाथदास, निजामाचा दिवाण, याने लुटविला. हेच लढाईला मुख्य कारण झाले. पेशवे आपल्या प्रांतांत चालन आले आहेत असे पाहून, मुसा बुसीच्या सल्यावरून निजामाने पुण्यावर चाल खेली, ह्या लढाईच्या प्रारंभाची हे व पुढील कांही पत्रे आहेत. १३ सवाल.. १४ नसीरजंग शौकतजंग १५ राजाजी, रघुनाथदास, रामदासपंत ही सलाबतजंगाच्या दिवाणाची निरनिराळी नांवें आहेत. .१६ माकूलमुचितं भवेत.