पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/171

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आझावर संतोषी होतील ह्मणून बोलिले. त्याजवरून विनंति लिहिली आहे. कृपा करावयास स्वामी समर्थ आहेत. दुसरें बोलिले की नसीरजंगामध्ये व आमामध्ये पहिली नाखुषी बहुत होती. हल्ली त्यांहीं महमद हुसेनखान दिवाण याजबराबर कसम खाऊन सांगून पाठविलें की तुह्माजवळ आमना दुसरा विचार नाही. तुह्मी आह्मी एक आहों. हा आपला करार आहे ह्मणोन ऐशास त्यांहीं कसम खाऊन सांगोन पाठविले. त्याप्रमाणे आहीं त्यास वचन दिधलें की तुही निखालस असलियास आमचीहि तुम्हाजवळ दुसरा विचार नाही. हे गोष्ट रावसाहेबांस आह्मी लिहितों. तुह्मी लेहून नसरिजंगाशी रावसाहेब बेवसवास राहात ते गोष्ट करावी. आधी तर नसीरजंग निखालस आहेत. ||मबादा त्याजवळोन कांहीं तफावत नजरेस आला तर आह्मास सांगावें. आली त्यास राहावर आणूं , निदान तंबी करूं, ह्मणोन बोलिले. त्याप्रमाणे सेवेसी विनंति लिहिली आहे. दुसरें बोलिले की गुदस्ता आमचे मारिफतीने तह जाला त्याप्रमाणे करार असावा. तुमचे दोस्त ते आमचे दोस्त. आमचे दोस्त ते तुमचे दोस्त. आमचे दुशमन ते तुमचे दुशमन. तुमचे दुशमन ते आमचे दुशमन. याप्रमाणे खातीरेस आणोन अमलात आणावें ह्मणून बोलिले. तेणेप्रमाणे सेवेसी विनति लिहिली आहे. सदहूं विनंतिपत्र नवाब गजफरजंग यांहीं अक्षरशा आइकिलें. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापना. आणीक बोलिले की नवाब सलाबत येही आह्मांस लिहिले आहे जे रावअजम फौज जमा करितात. गुदस्ताहून ज्याजती फौज धरिता याचा सबब काय ? ह्मणोन येविषई रावसाहेबांची मर्जी काय आहे ह्मणोन पुसिलें. सेवक बोलिलों की फौज सालाबाजपमाणेच आहे. रावसाहेबांस काजकामें बहुत आहेत. येक तर मोगलाचा दगाबाजीचा रूख नजरेने पाहिला तर याजकरितांहि खबरदार राहावे लागले. दुसरें गुजराथेंत व दिल्लीस फौज रवाना करणे. ऐसी कितेक कामें आहेत' परंतु फौज अद्याप जमा जाली नाही, व रावसाहेबाहि डेरे दाखल जाले नव्हते. फौजेस ताकीद जाली आहे. फौज जमा केलीच पाहिजे. फौजेखरीज काजकामें कसी होतील ? ह्मणोन बोलिलो. आणीक मुसाबुसी बोलिले || तुशांत.