पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/305

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८. व कलगी खोविली होती. चार घटका बसले होते. स्वारीसमागमें स्वार पांचशे व गाडदी वगैरे होते. शाहामाहमुदजीचे त्याचे भाषण काय जालें आणि तबरुक काय दिधला याचा शोध पुरता सवसगियापासून घेऊन सेवेसी लिहितो. निजामुदवला शहरांत आले ह्मणून त्याचे मुख्य मुसाहेब वजीदअल्लीखान त्याची भेट जाली नाही. उदईक मागती जातो. आज्ञा होती की लालामाहाराय वकील याची भेट घेत जाणे आणि वर्तमान शोध घेऊन लिहिणे. त्याजवरून आज छ १८ चार घटिका रात्र जालियावर माहाराय वकिलाचे घरी गेलो होतो. त्यास ज्या युक्तीने पुसावयाचे त्या युक्तीने पुशिलें. त्याणे सांगितले की लक्षमणराव खंडागळे व इभराईमखान घ्यावे. त्याजकडे सूत्र लावून लिहिली पुसली करितात. आज निजामुदवलास शब्द देतात की श्रीमंताकडे दारमदार करणे काय उचित होते ? यांस सारेच आज द्यावे. खोजे रहिमतुलाखान बहादूर बास्तेकर याजवर शब्द आणावा ऐसा मनोदय आहे. आजी मुख्य बंदगानअल्लीस शून्यातुल्य करावें हा हेत त्याचा आहे. बाह्यात्कारें तिघे बंधु एकत्र होऊन विचार करितात; परंतु परस्परे संकोचित आहेत. वडिलाच्या उतराईंत आहेत ऐसें लालामाहारायाने सांगितले. आजी ह्मणों लागले की मी इभराईमखान गाडदी याचेथे गेलो होतो; गोष्टीने गोष्टी निघाली; त्यास आह्मीं इभरामखानास हटलें की श्रीमंताशी बिघाडून कोठे राहूं ? पाहातां येकल्या रघोजी करांडियाच्या वोहपियाने बरें न आले. तुह्मांस कांहीं दोन चार परगणे मागणे तरी मागून आपल्या तालुकियास । जाणे. श्रीमंताकडील दारमदार जाला तो कायम करवितांच तुमचे बरें आहे. ऐसे संशय कितेकाप्रकारे त्याचे पोटांत घातले. ऐसे माहाराज सांगितले; परंतु हे गोष्टी दृढ नाही. ईश्वरसत्तेने सर्व शत्रूचे तर्कवितर्क लयातें पावतील. इभराईमखान गाडदी याची तलब एक लाख दरमाहा आहे. त्याजपैकी जातीचे पंचाण्णव हजार व पांच हजार शागीर्दपेशा. त्याचे त्यास