पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शांतता ह्मणून माहित नव्हती असे प्रतिपादन केलेले अद्यापहि अनेक लोकांच्या तोंडून ऐकू येते. ह्याला कारण पँटडमचा इतिहास व त्याची भौतिक पद्धति ही होत. अज्ञ किंवा नवख्या प्रेक्षकाच्या दृष्टीला भासणाऱ्या मराठ्यांच्या ह्या सैरावैरागतीला काही व्यवस्थित धोरण होते किंवा नव्हते, १६४६ पासून १७९६ पर्यंत ह्या महाराष्टांतील लोकसमहांत कोणत्या विचाराचे प्राधान्य होते व परराष्ट्राशी मराठ्यांच्या ज्या लढाया होत त्यांना कांहीं सयुक्तिक व समाधानकारक कारणे होती किंवा नव्हती या गोष्टींचा आत्मिकरीत्या ग्रांटडफ्ने विचार न केल्यामुळे ह्या असल्या मतांचा प्रसार झाला आहे. पद्धति, धोरण, विचार व नीति मराठ्यांच्या कृत्यांत होती किंवा नव्हती ह्याचा ग्रांटडफनें विचार न केल्यामुळे व त्याच्याखेरीज मराठ्यांचा दुसरा इतिहास अद्यापपर्यंत लिहिला गेला नसल्यामुळे ह्या दराग्रहाचे साम्राज्य सध्या झाले आहे. परंतु, ह्या दुराग्रहांना जागा असण्यास, माझ्या मतें, बिलकुल कारण नाही. मराठ्यांच्या कृत्यांना कांहीं धोरण होते हे सप्रमाण दाखवितां येतें, ह्याच प्रश्नाचा विचार पुढील विवेचनांत केला आहे. . विवेचन दुसरे. पंधराव्या व सोळाव्या शतकांत आणि सतराव्या शतकाच्या पूर्वाधात महाराष्ट्राची स्थिति फारच विपन्न झाली होती. त्या वेळचे वर्णन करितांना समर्थ ह्मणतात:-"तीर्थ क्षेत्रे मोडिलीं । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली । सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥ यवनांनी हिंदु धर्माचा उच्छेद करून टाकिलां तेव्हां “ देव, धर्म, गो, ब्राम्हण ह्यांचे संरक्षण करण्यास" शिवाजी राजे अवतीर्ण झाले व त्यांनी यवनांच्या सर्वोच्छेदक गतीचा प्रतिरोध केला. ह्या महत्कृत्याला अनुलक्षून समर्थ शिवाजीराजास लिहितात की, “ तुह्मी झाला ह्मणून महाराष्ट्र धर्म कांहीं तरी राहिला; " व पुढे सप्रेम विनवणी करितात की, “ आपण धर्मस्थापनेची कीर्ति उत्तरोत्तर अशीच संभाळिली पाहिजे.” धर्मस्थापनेची कीर्ति संभाळण्यास काय करावे ह्मणाल तर “ अमर्याद फितवेखोर लोकांचा संहार कगवा; न्यायसीमा उल्लंधू नये; नेटके बंद वांधावे; तुरंग, शस्त्र आणि स्वार जमवावें" आणि सर्वात पहिले काम काय करावे तर "मराठा तितका मेळवावा आणि जिकडे तिकडे महाराष्ट्रधर्म वाढवावा" आपला महाराष्ट्रधर्म वाढविण्यास आणखी उपाय कोणते तर " वहुत लोक मळवाव । एक विचार भराव । कष्ट करून घसरावें । म्लेंच्छावरी ॥" आणि इतके करून झाल्यावर मग, “ आहे तितकें जतन करावें । पुढे आणीक मेळवावें । महाराष्ट्र राज्य करावें । जिकडे तिकडे ॥” समर्थांच्या ह्या उक्तींवरून कळून येईल की, सतराव्या शतकाच्या पूर्वाधात महाराष्ट्रांतील विचारी पुरुषांची मने एका जबर कल्पनेने भारून गेलेली होती. ती कल्पना कोणती तर महाराष्ट्रधर्माची स्थापना करणे ही. ही कल्पना सफल करण्याचे अवघड काम शिवाजीने केले. शिवाजीच्या एकंदर चरित्नाची गुरुकिल्ली हीच कल्पना होय. ही कल्पना ध्यानात ठेवून मग शिवाजीच्या व त्याच्या अनुयायांच्या कृत्यांचा विचार करावा