पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/390

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार काय केला असे ? पुढे मातबर फौजेनसी मजलदरमजल खासा स्वारी जलदीने येऊन पोहोचेल. तरी याचा विचार लिहिणे. व त्याजकडील कोण्ही इतबारी मातबर वकील हुजूर यावा हे जरूर व्हावे. लिहिल्याअन्वये तरतूदहि व्हावी. तुझाकडील दोन तीन सोलाचे हिशेबाचे झाडे तयार असावे. व यंदा अबदालीचे गडबडीमुळे रुपया प्रथम मिळणे लांब आहे. त्यास, खर्चास रुपयाची तरतूद जाहाली पाहिजे. बाँकी किंवा साल मजकुरचा ऐवज, कांही पुढील ऐवजपैकी याप्रमाणे, वीस लाख रुपयेपर्यंत तरतूद करून माळव्यांत पोहचतांच ऐवज कांहीं येई, काही पुढे येऊन पोहोचते, हें जरूर करणे. हिंदुपत वगैरे रजवाडे आपले फौजेनसी सामील व्हावे. पारचे रजपूत पूर्ते तुमचे लगाचे असतील. ते मातबर आल्यास उपयोगी असेहि यावयास सिद्ध करावें. मागून लिहिले ज्या रोखें घेऊन यावें असें लेहून पाठवू त्या रोखें आणावें. मुख्य गोष्ट बातमी फार जलद चांगली जलद पोहोचाविणे. पैकियाची तरतूद जरूर करणे. + जाणिजे. अबदाली जयनगर पलीकडे आहे. तेव्हां तुमचे तालुकियांत फार पेंच नाही. बारीक, लबाडी कोणी करील तर तुह्मी गेला५१ आहां, नीट कराल. अबदालीचें पारपत्य नंतर १७५८ त दादांशी काशी, अयोध्या खास द्यावयाचा करार केला व प्रयोगासंबंधी चालवाचालव केली व तिन्ही शेवटी दिली नाहीत. ह्यास मुख्य कारण दादांचा नेभळा कारभार झाला. पुढे हे काम विठ्ठल शिवदेव यांजवर सोपवून दादा देशी आले. परंतु, विठ्ठल शिवदेवानेंहि ही मामलत बारा लाखांवर चुकविली. येणेप्रमाणे सरदारांचे व खुद्द दादासाहेबांचे सुजाअतदौल्यावर बरेच उपकार झाले होते ( पत्रे व यादी ३६२ व ३७३ ). तशांत गोविंदपंताचें व सुजाअतदौल्याचे विशेषच रहस्य होते. १२ जुलै १७६० च्या पुढे सुजाशी भाऊंचा पत्रव्यवहार सुरू झाला ह्मणून " महादजीच्या चरित्रांत " रा. नातू लिहितात. परंतु, १२ जुलैच्या बरेंच अगोदर ह्मणजे १४ मार्चच्या पुढे लवकरच पत्रव्यवहार सुरू झाला असे दिसते. २४८ ह्मणजे आतापर्यंत हे झाडे तयार नव्हते असा अर्थ झाला. २४९ गोविंदपंताकडे बाकीहि निघत होती हे स्पष्ट आहे. २५० चमेल पारचे. २५१ “ आह्मी लवकरच तिकडे जातों” अशा अर्थाचे भाऊंस गोविंदपंतानें पत्र लिहिले असावे व त्याचा अनुवाद भाऊंनी ह्या पत्रांत केला आहे. हे पत्र लिहि ३४