पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/453

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्वरीच सर्व बंदोबस्त ठीक करणे. वरकड सर्व पुरवणीपत्रीं लिहिले आहे त्यावरून कळेल. २॥ छ १४ जिल्हेज. हे विनात. [ २२२] ॥श्री॥ २८ जुलै १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरिः अबदालीचे मते आपले देशास जावें, लढाई एकंदर पाडू नये. एक वाटा त्याची देशची फौज गेली; दोन वाटे राहिली आहे. सुज्यातदौले यांचे मते आपले हातें व नजीबखान रोहिले यांचे हातें अबदालीकडील तह श्रीमंतांनी करवावा, ह्मणजे आमी सर्व ठीक करून देऊ, त्यास देशास लावून देऊ: या अन्वयें त्याची पत्रे आपणास येतात. तरी सुज्यातदोले यांस पत्र थैली सरकारांतून पाठवावी. त्यांत आमचे लिहिण्यास हवाला घालून ल्याहावें. हे चित्तास आले तरी करावें, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, सध्यां सरदार व बळवंतराव गणपत दिल्लीस पाठविले आहेत. त्यांनी शहर घेतले. किल्लाहि सत्वर घेतील. आह्मी मजलदरमजल तेथे जातो. तें काम जालियानंतर येविशींचें लिहून पाठवू. तुझीं तिकडील वर्तमान आणवून वरचेवर लिहून पाठवीत जाणे. अंतर्वेदीतून तुह्मांकडून उगळा असावा. ॥ छ १४ जिल्हेज. हे विनंति. [ २२३] ॥ श्री॥ २८ जुलै १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. सुज्यातदोले व नजीबखान यांजकडील मार विस्तारें