पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/46

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ शिवाजी त्याचा मुलगा रामराजा ह्याला गादीवर बसवावें ही शाहूची तिसरी आज्ञा होती.. तसेंच (४) सरदारलोकांचेंहि पुर्वीप्रमाणेच चालवावें अशी शाहूची चवथी आज्ञा होती. या चार आज्ञांपैकी फौजेचा अधिकार मिळविण्याकरितां बाकींच्या तीन आज्ञा मनांतून नसतांही बाळाजीने मान्य केल्या व पुढे समयानुसार रामराजाचे व सरदारांचे महत्व कमी करण्यास कमी केले नाही व कोल्हापुरच्या संभाजीशी पुढील दहा वर्षे मोटें प्रेमाचे वर्तन ठेविलें. इतकेच नाही; तर रामराजा जिवंत असतां नवा राजा करावा असा त्याने पुढे १७६१ त घाट घातला ( लेखांक २८९). बाळाजीची संभाजीराजावर किती ममता होती हे काव्येतिहासांतील ३३५ व्या पत्रावरून कळून येईल. संभाजीराजा १७६० च्या डिसेंबरांत वारला.त्यानंतर १७६१ च्या जूनच्या ९ तारखेला हे पत्र लिहिले आहे. त्यांत संभाजीशी बाळाजीचा केवढा स्नेह होता तें जिजाबाईने मोठ्या सलगीने ध्वनित केले आहे व स्पष्ट लिहिलेंहि आहे. कोल्हापुरची व सातारची गादी एक करावी व सर्व सत्ता आपल्या हाती ठेवावी हा बाळाजीच्या मनांतला द्विविध हेतु होता. ही एकी करण्याची कल्पना शाहूराजाच्या डोक्यात शिरली नाही, त्यामुळे 'करवीरचं न करनें' ह्मणून बाळाजीला त्याने आज्ञा केली. हा हेतु साध्य झाला असतां मराठयांच राज्य एकछत्री झाले असते अशी बाळाजीची योजना होती. परत, शाहूच्या हट्टामुळे व अज्ञानामुळे बाळाजीला हा आपला फारा दिवसांचा हेतु एकीकडे ठेवावा लागला आणि शाहूच्या आज्ञा त्या वेळेपुरत्या तरी शिरसा मान्य कराव्या लागल्या. ह्या आज्ञा मान्य करण्यांत बाळाजीचें अतोनात नुकसान झाले. दोन्ही राज्ये एक होण्याची आयती सधि येत होती ती गेली ती गेलीच; परंतु, स्वतःची सत्ता कायम ठेवण्यास त्याला नंतर तीन वर्षे एकसारखी धडपड कगवी लागली. कारण, रामराजा राज्यावर आल्याने ताराबाई, महत्त्व अतिशय वाढले. १७०० त राजाराम महाराज वाग्ल्यावर ह्या बाईनें त्यावेळच्या मुत्सद्यांच्या व शाहूच्या विरुद्ध वागून सर्वांचा द्वेष जोडिला होता. शाहूराजे १७०७ मोंगलांच्या कह्यांतून सुटल्यावर त्यांच्याशीहि १७१२ पर्यंत ह्या बाईनें वाद मांडिला होता १७३० त ह्या बाईला शाहूनें धरून सातारा येथे कैदेत ठेविलें. १७४९ पर्यंत ही साताऱ्यास प्रतिबंधांत होती. पुढे हिचा नातू जो रामराजा त्याला गादी मिळावी असें शाहूने ठरविले. तेव्हां हिचे महत्त्व वाढून आपल्या नित्याच्या स्वभावाप्रमाणे हिने बाळाजीशी प्रति स्पर्धा मांडली: दादोबा प्रतिनिधि व यमाजी शिवदेव ह्यांचे खूळ माजविलें; बाबूजी नाईकास भर दिली; सलाबतजंगाचा दिवाणजो रामदासपंत त्याच्याशी राजकारण केलें; बाळाजीची पेशवाई रामदासपंताचे भावास देण्याचा बेत केला; महादोबा पुरंदयाला देखील फितविलें (का०पत्रे, यादी वगैरे३५९); व त्याच्या करवी रामचंद्रबाबा शेणवई व सदाशिव चिमणाजी ह्यांचे व बाळाजांचें वाकडे आणिलें; दमार्जाला साताऱ्यास बोलाविलें; उमाबाई दाभाडिणीस चढी लाविलें; खद्द शिंदेहोळकरांच्याहि युद्धीचा भेद करून पाहिला व रघोजीला मोंगलाकडे जाण्यास भर दिली. हा खेळ एकसारखा १७५० पासून १७५३ पर्यंत चालला होता व तो चालत