पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/485

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२५६] ॥श्री॥ ११ आक्टोबर १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी यांसि:विनंति उपरि. राजश्री गणेश संभाजींनी बुंधेल्यांसी घसघस लावून छत्रपूरचे गांव मारिले, शहरास उपद्रव लावणार, सावकारा उठतो, ह्मणोन लिहिले होते त्यास त्याणी त्यांसी कटकटीचा प्रसंग पाडूं नये, बुंधेले फौजसुद्धां घेऊन हुजूर यावं, येविशी म॥रनिले यांस परस्पर लिहून पाठविलें आहे, त्याप्रमाणे ते करितील. कदाचित् हे याप्रमाणे बंधेल्यास सांगत असतां ते न ऐकत, तरी तुझीहि त्यांस चांगले तन्हेनें लिहून सांगोन ऐकवावें. फौजसुद्धां हुजूर येत ते करावें. नाही तरी पेशजी चिरंजीव राजश्री समशेरबहादर गेले होते, ते वेळेस तिकडे बखेडा जाहला, फिसाद जाहली. तसा प्रकार होऊ न देणे. जाहलिया सरकार काम ठीक होणार नाही हे सर्व ध्यानांत आणून गणेश संभाजी बुंधेल्यास सांगतील त्याप्रमाणे ते ऐकोन येत ऐसे करणे. विरुद्ध पडेल तें न करणे. समशेरबहादरास तुमचेच तर्फेचा विरुद्ध ते वेळेस पडला. तसें न व्हावें. तुमची त्यांची पुर्ती ओळख आहे. याकरितां त्यांस स्पष्ट चांगले त-हेनें सांगोन ऐकवणे. जाणिजे. छ १ रबिलोवल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. । २५७ 7 ॥ श्री॥ ११ आक्टोबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥यांसः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कशल जाणन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुझी पत्रे पाठविली ती पावली. बंधेल्यांकडे राजश्री गणेश संभाजी याणी कजिया आरंभिला आहे त्यास चहूंकडे पेंच नसावे. तजविजीनें बंधेले हाताखाली रहावे, याचा विचार म॥ निलेस लिहावा, ह्मणोन लिहिले ते कळलें. ऐशास हाच म॥ गणेश संभाजी यांस