पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/503

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २७८ ] ॥श्री ॥ विनंति उपरि. राजश्री अंताजी माणकेश्वर यांजकडील दहा हजार रुपयांची कबज येथे घेतली आहे. ऐवज चार लक्ष वीस हजारापैकी देववावा. हे विनंति. [ २७९] ३१ डिसेंबर १७६०. राजश्री बाळाजीपंत बाबा गोसावी यांसिः अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्न। कुसाजी व जानराव पाडगुडे रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वानंदलेखन करीत गेले पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री मल्हारजी होळकर सुभेदार याणी आह्मास रोजमेरा याची वरात तुह्मावर रुपये ७४७५ सात हजार चारशे पंचाहत्तराची दिली होती. दरमाहे करार करून त्या ऐवजी रुपये ३४८७॥ तीन हजार चारशे साडे सत्यांशी हस्ते बाळाली अनंत रानडे-कारकून यांचे मार्फतीने भरून पावलो.हे कबज लिहन दिले. सही बि। कारकून. मिती मार्गशीर्ष वद्य दशमी. शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे, छ २२ जमादिलावल सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे. हे विनंति. मे॥ दिली. । २८० ] ॥श्री॥ २४ डिसेंबर १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामीचे सेवेसीः पो। जनार्दनराम नि॥ नारायणराव बापूजी साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबी तुह्मांकडून तुमचा ऐवज दिल्लीस आला आहे त्यापैकी देविले रुपये