पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/74

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ विचार होता; परंतु गंभीरनदीस पाणी फार आल्यामुळे दहा पंधरा दिवस त्याला मध्येच कुचंबावे लागले. जूनच्या शेवटी त्याने गंभीर नदी ओलांडिली व ६ जुलैला त्याची व शिंदेहोळकरांची भेट झाली. ह्या भेटीत पुढे काय करावयाचे ह्याचा भाऊंनी व सरदारांनी विचार केला. त्याचे वर्णन देण्याच्यापूर्वी सुजाउद्दौला , अल्लीगोहर, मीरजाफरअल्ली, नजीबखान, महमदखान बंगष, हाफीज रहिमतखान, वगैरे मंडळी काय करीत होती तें सांगितले पाहिजे. पडदुराहून निघतेवेळीच सुजाउद्दौल्याशी स्नेह करण्यास भाऊनें गोविंदपंतास लिहिले होतें. अबदालीचे व सुजाचे पिढीजाद वाकडे होते. नजीबखानाचें व सुजाचेंहि फारसे चांगले कधीच नव्हते. १७५९ च्या नोव्हेंवरांत तो नजीबखानाला मिळाला. ह्याचे कारण असें होतें की मराठे आपल्यावर स्वारी करणार ही त्याला भीती होती. नाही तर नजीबखानाला तो मुळीच मिळाला नसता. दत्ताजी अंतर्वदीतून यमुनेच्या बाजूला परतल्याबरोबर सुजा नजीबखानाला सोडून आपल्या प्रांतांत निघून आला. आपला प्रांत सुरक्षित राहील किंवा नाही एवढीच काय ती सुजाउद्दौल्याला काळजी होती. तिचे निवारण झाल्याबरोवर सुजाने नजीबाला सोडून दिले. नजीबाला सोडून सुजाला दोन अडीच महिन झाले नाहीत तोच गोविंदपंताच्या द्वारे मराठ्यांचें सजाशी बोलणे लागले. ह्यावेळी गाविंदपंताला सुजाशी स्नेह दृढ व कायमचा करण्यास उत्तम संधी आली होती. नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांच्यामध्ये गोविंदपंताचा प्रांत होता. तो जिंकून घेईतोपर्यंत नजीबाशी स्नेह दृढ करण्यास गोविंदपंताला पुष्कळ वेळ होती व स्पर्धा कोणाचीच नव्हती. तेवढया वेळांत गोड बोलून व जरब दाखवून सुजाला आपल्या बाजूला ओढून घेण्यास सदाशिवरावानें गोवंदपंताला हकम केला होता. तुमचा आमचा स्नेह पूर्वापारचा आहे, तुमच्या वडिलावर आह्मीं उपकार केले आहेत, तुमच्यावरहि सरदारांची व रघुनाथरावाची ममता आहे, चकत्याची पातशाही कायम ठेवून तुह्माला वजीर करण्याची आमची इच्छा आहे, तुमच्यासारख्या मातबर माणसाखेरीज चकत्याच्या पातशाहीचा बंदोबस्त होऊन येणार नाही ( लखांक १७३ व टीप २६१), नजीबखान मात्रागमनी आहे व तो तह्मांला थापा देऊन अबदालीकडे नेऊन फसवील, पैशाकरितां अबदाली तुमची इज्जत घेईल व मग तुह्मी 'पस्ताव्यांत पडाल, चकत्याच्या पातशाहीत अबदालीचा हात पडणे इष्ट नाहीं, हिंदुस्थानच्या पातशाहीची व्यवस्था लावण्यास हिंदुस्थानांत तुह्माला व आझालाच तेवढा अधिकार व हक्क आहे, तुह्मी अबदालीला मिळाला तर आमचें जन्माचे वैर संपादाल, तुह्मी आमचेकडे आल्यास अबदालीला जिंकल्यावर तुह्माला बराच प्रांत व मुख्य वजिरी देऊं, न आल्यास तुमचें सर्वस्वी नुकसान होईल,वगैरे गरमनरम गोष्टी बोलून व वाटतील त्या योग्य सवलती देण्याचे कबूल करून सुजाला आपल्या बाजूला कसें तरी करून ओढून घ्यावें ह्मणून सदाशिवरावाचे आग्रहपूर्वक सांगणे होते. सुजाच्या मनांत मराठ्यांना मिळावयाचे नसल्यास, निदान त्याने अबदालीला तरी मिळू नये एवढे तरी काम करावेंच करावें ह्मणून सदाशिरावाची गोविंदपताला इशारत