पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती. सुजाउद्दौल्याला मराठ्यांच्या बाजूला ओढण्यांत फारच फायदा होता. सुजाउद्योल्याचा प्रांत रोहिल्यांच्या प्रांताला लागून असल्यामुळे सुजाच्या प्रांतांतून रोहिल्यांच्या प्रांतांत दंगा करण्यास मराठ्यांना चांगली सोय झाली असती; सुजाच्या प्रांतांतून अबदालीला दाणावैरणहि पोहोचली नसती व सुजाकडून अबदालीला पैशाची मदतहि झाली नसती. शिवाय, सुजाउद्दोल्यासारखा मातब्बर मुसुलमान सरदार अबदालीला मिळाला नसता ह्मणजे अहमदखान बंगष, हाफीज रहिमतखान वगैरे लहान सहान संस्थानिकहि अबदालीला चिकटून राहिले नसते. सुजाउद्दौल्यासारखा मातब्बर मुसुलमान मराठ्यांच्या बाज़ला आणिला ह्मणजे हिदुस्थानांतील सर्व मसलमानांना मराठ्यांविषयी विश्वास उत्पन्न होऊन त्यांचीहि मदत मराठ्यांना झाली असती. असे मोठमोठे फायदे सुजाच्या स्नेहापासून मराठ्यांना होण्यासारखे होते; व ह्याच कारणाकरितां गोविंदपंताला सदाशिवरावभाऊनें शेकडों वेळा ह्यासंबंधी लिहिले. गोविंदपंताचा सुजाशी कित्येक वर्षांचा स्नेह होता. आपण वाटेल तें काम करून देऊं ह्मणून गोविंदपंताने पुण्यांत भाऊला आश्वासने दिली होती. तेव्हां हे सुजाचा स्नेह जुळवून आणण्याचे काम गोविंदपंत घडवून आणील अशी भाऊला आशा होती. सुजाशी स्नेह करण्यापासून केवढा फायदा होईल हे अबदालीहि जाणून होता. सजा आपल्याला मिळाला ह्मणजे वाकीचे सर्व मुसुलमान संस्थानिक आपल्या बाजूला अवश्य आलेच पाहिजेत ह्याची अबदालीला पूर्ण खात्री होती. परंतु सुजाच्या व अबदालीच्यामध्ये गोविंदपंताचा प्रांत व त्याची फौज असल्यामुळे सुजाशी बोलणे करण्याचीच अबदालीला प्रथम अडचण आली. ही अडचण काढून टाकण्याकरितां १७६० च्या मेंत जहानखान व नजीबखान ह्यांना त्याने गोविदपंतावर पाठवून दिले. गोविंदपंताची परीक्षा पहाण्याची हीच वेळ होती. ह्यावेळी जयापजयाची सर्व सूत्रे गोविंदपंताच्या हाती होती. नजीबखानाची व सुजाउद्दौल्याची भेट हरएक प्रयत्न करून गोविंदपंताने होऊ द्यावयाची नव्हती. कोळजळेश्वराहून निघून गोविंदपंताची ठाणी मारून सकुराबाद, इटा वगैरे स्थलें घेत घेत सुजाउद्दौल्याला विठूर वगैरे ठिकाणी जाऊन भेटावे असा नजीबखानाचा बेत होता. हा बेत हाणून पाडण्याचें गोविंदपंताचे काम होते; परंतु, दु:खाची गोष्ट की, हे काम गोविंदपंतानें मनापासून केले नाही. इटावें प्रांतांतील सकुराबाद वगैरे ठिकाणचे गोविंदपंताचे ठाणेदार आपापली ठाणी यवनांच्या देखत सोडून देऊन पळून येऊ लागले. स्वतः गोविंदपंत मागे मागेंच राहूं लागला. सुजाउद्दौल्याला पाठीशी घालून नजीवाची व त्याची भेट प्राण गेला तरी होऊ द्यावयाची नाही हा जो निश्चयाचा व जोराचा प्रयत्न गोविंदपंताने करावयाचा तो त्याने केला नाही. इतकेच नव्हे; तर वेळ होता त्या वेळी सुजाशी देखील त्याने मळमळीतच बोलणें केलें. सुजा बोलन चालून मराठ्यांच्या स्नेहाविषयी उदासीन होता. चार महिन्यांपूर्वी मराठे आपल्यावर स्वारी करणार होते ही गोष्ट त्याने इतक्या थोड्या अवधीत विसरून जावी हे अशक्य होते. अबदाली व नजीब ह्यांच्याकडून कोणी बोलायाला आले नाही तोपर्यंत मराठ्यांच्या बाजचे आपण आहोत असाच त्याने बोल