२२८ पाकिस्तानचे संकट पतितत्व, पापीपणा इत्यादि परंपराप्राप्त कल्पना उराशी बाळगून ठेवून आपण हिंदुसमाजाचे केवढे अकल्याण करीत आहोंत हे हिंदुसमाजांतील मोठमोठ्या माणसांनाहि अजून पटावयाचे आहे. कर्ण हा कुंतीचा कानीन पुत्र होता. जनलज्जेच्या भीतीमुळे कुंतीने त्याचा त्याग कसा केला हे 'गंगे गोदे यमुने' या प्रसिद्ध आर्येमुळे तरी सर्वांना अवगत आहे. कानीन संततीबद्दलची समाजांतली कोती भावना कुंतीच्या पुत्रांना बाधक ठरली ! पांच पांडवांच्या बरोबर सहावा म्हणून जो कर्ण सत्पक्ष घेऊन लढला असता तो कर्ण दुर्दैवाने असत्पक्षांतील रणशूर ठरला ! हैं महाभारतांतील उदाहरण सदैव डोळ्यांपुढे असूनहि, हिंदु समाजाने अद्याप जागृत होऊं नये काय ? या कानीन संततीची हिंदु म्हणून जोपासना होऊ लागली, या कानीन संततीच्या योगक्षेमाचा भार हिंदुसमाजाने सामाजिक जबाबदारी म्हणून उचलला तर, या कानीन संततींतून हजारों रणशूर ‘कर्ण' निर्माण होणार नाहींत का ? परकी राजसत्तेमुळे हिंदु समाजांतील क्षात्रवृत्तीचा लोप झाला असे आपण उठल्याबसल्या म्हणतो आणि ती आपली तक्रार रास्तहि आहे. शस्त्र केव्हां ना केव्हां तरी हातीं धरण्याची संधि मिळाल्याविना क्षात्रवृत्तीचे पोषण होऊ शकत नाहीं हें सत्य असल्यामुळेच, स्वातंत्र्यवीर सावरकर, वाईटपणा पत्करूनह, ‘सैन्यांत शिरा' असा उपदेश हिदूंना करीत आहेत. । ज्यांच्यामागे प्रतिष्ठेचे, पोराबाळांचें, अगर जबाबदारीचे लटांबर आहे अशी माणसेंहि क्षात्रतेज प्रकट करू शकतात; पण, माणूस जितका पाशशून्य तितका क्षात्रवृत्तीच्या जोपासनेला तो अधिक लायक ठरण्यासारखा असतो. या दृष्टीनें, या कानीन संततीचे संगोपन करण्याचे महत्त्व हिंदुसमाजाने वेळीच ओळखा वयाला नको काय ? . तीस कोटी हिंदु समाजाची जूट घडवून आणून त्या समाजाला पारतंत्र्य मुक्त करणे हे हिंदुसंघटनेचे ध्येय आहे. या ध्येयासाठी काय झाले पाहिजे
पान:महमद पैगंबर.djvu/239
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही