या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २४९ ] ज्याने आपली नास्तिक बुद्धि नाहींशी केली त्याच्याशी आपली सलगी जडावी, व ही सलगी हमेशाची असावी ह्मणून हा संबंध जोडल्यास फार उत्तम होईल, असे अबूबकर यास वाटत होते. ह्मणून ह्या गोष्टीस रुकार देण्याविषयीं अबूबकराने पैगंबरास फारच आग्रहपूर्वक विनवणी केली. तेव्हा त्याने आपल्या कन्येच्या सातव्या वर्षीच तिचा विवाह पैगंबराबरोबर लाविला. अशी गोष्ट देशचालीसहि प्रतिकूळ नव्हती. हा पैगंबराचा तृतीय संबंध होय. उमर-इब्न अलखताब याला हफसा नांवाची एक मुलगी होती. पुढे जो इस्लामाचा दुसरा खलीफ झाला तो हाच उमर होय. ह्या बाईचा नवरा बेदर येथील लढाईत मरण पावला होता. तिचा स्वभाव फारच तापट असल्यामुळे तिनबरोबर पुनः कोणी लग्न केले नाहीं, व तिला तसेच वैधव्य दशेत पुष्कळ दिवस घालवावे लागले. पैगंबराच्या ज्या ज्या शिष्यास लग्न करावयाचे होते त्याला त्याला तिजबरोबर लग्न करण्यास भीति वाटे. ह्यामुळे तिच्या बापाला फारच वाईट वाटत असे. हा जो आपल्याला दोष लागला आहे तो दूर करण्यासाठी उमर याने माझ्या मुलीबरोबर लग्न कर असे अबूबकर यास सांगितलें. अबूबकर याने ती गोष्ट नाकारली. नंतर उमरने उसमानास विचारलें. उसमानानेंहि ती गोष्ट कबूल केली नाही. हे पाहून उमर यास फारच त्वेष चढला व तसाच तो संतापाने पैगंबराकडे गा-हाणे सांगण्याकरिता