[ २६६ ] प्रेमभावाने वागावे, ह्मणून पैगंबराने पुष्कळ यत्न चालविले. दोघां भिन्न जातींच्या माणसांत तंटा झाला तर जातवाले लोक तंटा आपला आहे असे समजून परस्पर जातिजातींशीं युद्ध माजवीत. तसे न व्हावे ह्मणून पंच लोकांनी तटे तोडावे अशी पैगंबराने योजना केली. अवस व खिजराज असा जो कुटुंबभेद असे तो त्याने नाहींसा केला. त्याने आपल्या जमातींत यहूदी व ख्रिस्ती यांचा समावेश केला. जे त्याच्या धर्मावर श्रद्धा ठेवीत होते, त्यांचा आपसांत प्रेमभाव वाढून त्यांचे एकमेकांचे घरीं जाणेयेणे असावे ह्मणून त्याने नियम घालून दिले. यहूदी, ख्रिस्ती व साबी आणि इतर ज्या लोकांचा परमेश्वरावर भाव आहे, व जे परलोक आहे असे मानितात, व सदाचरणाने वागतात, त्यांवर कोणत्याहि प्रकारचे संकट गुदरणार नाही, असे त्याने जाहीर केले. जो कोणी आपला सूड उगविण्याचा हक्क सोडून देईल, त्यास ईश्वरापासून पापाची क्षमा मिळेल. जो कोणी माणसांमध्ये मध्यस्ती करून वितुष्ट मोडून टाकील, त्याचे नुकसान न होतां, कल्याणच होईल, परंतु जो कोणी वितुष्ट माजवील त्याला दुःखच सोसावे लागेल असा त्याने बोध केला. | याप्रमाणे पैगंबर लोकांची सुधारणा करीत असतां व त्यांस दुराचरणापासून दूर करून पुण्यवंत करीत असता, त्याचा सूड घ्यावा ह्मणून त्याच्या शत्रूनी अविश्रांत श्रम चालविले. त्याला मारून टाकून त्याच्या मतास मुळापासून खणून काढून
पान:महमद पैगंबर.djvu/269
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही