[ २६७ ] मागे हटू नका. तुमचे शत्रु तुमच्यावर चालून आल्यास आपला बचाव करण्यास तत्पर असा; परंतु तुह्मी होऊन प्रथमतः तुटून पडू नका. आगळीक करणारावर परमेश्वराचा क्रोध आहे. असे पैगंबराचे आपल्या लोकांस सांगणे होते. | यहूदी लोकांनी मुसलमान लोकांशीं जें भयंकर वितुष्ट केलें, मुसलमानांबरोबर केलेल्या तहनाम्याची व करारनाम्याची जी त्यांनी पायमल्ली केली, सतत बंडखोरपणा जो त्यांनी चालविला, आणि मुसलमानांस मूर्तिपूजकांच्या हातीं देण्यासाठीं जो त्यांनी पुनः पुनः प्रयत्न चालविला, त्या सर्व गोष्टींवरून यहूद्यांचे पारिपत्य करणें मुसलमानांस भाग पडले. मुसलमानांची जमात त्या वेळी लहान व दुर्बळ होती ह्मणून त्यांचा बचाव करण्याकरिता व त्यांच्यावर सहसा कोणीं येऊन पडू नये ह्मणून धास्ती उत्पन्न करण्याकरिता यहूदी लोकांचे पारिपत्य करणे भाग झाले. त्यांचा सूड उगवावा या हेतूने त्यांचे पारिपत्य केलें नाहीं. ही गोष्ट निर्विवाद आहे की मदीनेकरांकडून आपल्या पुरींत येण्याविषयी त्यास पाचारण झाल्यामुळे महमदानें आरंभिलेल्या कार्यास विजय मिळाला, तसेच ह्या निमंत्रणाच्या अंगीकारापासून जशी मदीनेकरांच्या धर्माध्यक्षपणाचीं सर्व सूत्रे त्याच्या हातांत आली, तशीच राज्यसूत्रे हि त्याच्या हस्तगत झाली. त्यामुळे मुख्य न्यायाधीशीचे काम व प्रजापालनाचे काम हीं त्याच्या अंगावर येऊन पडली. जसे
पान:महमद पैगंबर.djvu/271
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही