हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६८ )



महाबळेश्वर घांटमाथ्याची हवा लागल्याबरोबर बरे वाटुं लागेल, व बहुश: एक दोन रात्रीं येथें काढल्यावर त्याच्या त्वचेवर उष्णापासून आलेली त्रासदायक विदूपता नाहींशी होईल. येथील थंड हवेमुळे दुपारचें जेवण झाल्याबरोबर प्रत्येकांस थोडीशी वामकुक्षी घेप्ण्याची इच्छा सहज उत्पन्न होते, व ज्याअर्थी बहुतेक लोक येथें आरामासाठींच येणारे असतात त्याअर्थी ती इच्छा टाळण्याबद्दल कोणी फारशी धडपडही करींत नाहींत. परंतु हिचा होईल तितका आव्हेर करणें या हवेला फार इष्ट आहे. तथापि नाइलाज होऊन झोपेची मिठीच पडली तर त्यावर उपाय ह्मणून सकाळ व संध्याकाळीं कोणत्या तरी प्रकारचा बराच व्यायाम केला असतां, ही दुपारची झोंप ह्मणण्यासारखी बाधक होणार नाही. असें समजूनच युरोपियन लोक देखील तिचा थोडाबहुत आदर करण्यास मागें पुढें पाहत नाहींत. महाबळेश्वरचें पाणी जात्या स्वच्छ पण जड आहे. चांगला व्यायाम केला तर यासारखें पाचक पाणी दुसरें नाहीं, पण जो कोणी व्यायाम न करील त्याला ते भोंवल्याशिवाय कधींही