चवीणी ऊर्फ रानकेळी- हीं येथून सुमारें दोन मैलांवर फेिटझरल्ल घाटाजवळ व मालकंपेठच्या आसपास सर्व ठिकाणं पुष्कळच आहेत. यांचीं पानें केळीचे पानाप्रमाणें मोठीं असतात; व त्यांवर जेवणाचें पदार्थ वाढून भोजन करितात. पाऊस पडला म्हणजे हीं आपोआप उगवतात. मे महिन्यांत देखील हीं बाजारांत विकायास येतात. गांवकेळीप्रमाणेंच यांस केळफुलेही येतात. त्यांची भाजी चांगली होते. पुढें पाऊसकाळ संपलेवर याचा कोंब गरीब लोक तसाच खातात; व जमिनींतील त्याचा गड्डा शिजवून त्याचा सुग्रास आहार करितात. दुष्काळसालीं लोकांस खाण्यास या कांद्यांचा फार पुरवठा झाला होता. याच्या वाळलेल्या सालीचे दोर ओझी बांधण्यास उपयोगी पडतात. हे कंद वाळवून दळले असतां पीठ सपिठीप्रमाणें पांढरें होतें व ते तवकिराप्रमाणें उपोषणास खाण्याचें उपयोगी पडण्याजोगें होते.
कर्दळी किंवा हळदीच्या पानाप्रमाणें पानें असलेर्लीं चवराचीं झाडें पाऊस पडतांच रानोमाळ आपोआप डोकीं वर काढतात. यांचीं पानें काढून पावसाळ्यांत