हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११४ )


 सावा व काठळी- ही धान्येंही नाचणीचे शेतांतच एकेक वर्षाआड करितात. जमीन नांगरून उन्हाच्या तापींतच यांची पेरणी करतात. नंतर पाऊस पडल्यावर हीं उगवून वर येतात, तेव्हां यांची भांगलणी मात्र चांगली काळजीनें करावी लागते. कारण, यांत पेरणी केलेनंतर पाऊस पडून पीक व दुसरें पिकांस अपाय करणारें गवत हीं दोन्ही सारखी वाढतात, तेणेंकरून पिकाचा जोम कमी होतो. पुढें दोन अडीच महिन्यांनीं तें पीक तयार झाल्यावर काढून घेतात. या साव्याचें पिकांत तुरीची मोगण करतात.

 रायभोग, काळीसाळ, वरंगळ, लव्हेसाळ, मांजरवेल, जिरेसाळ या जातींच्या भाताचें पीक मालकमपेठच्या पांच मैलाच्या त्रिज्येचे हद्दींत करतात. ह्यांच्या वर दिलेल्या अनुक्रमानेंच ही एकापेक्षां एक उंच प्रतीचीं आहेत. यांपैकी पहिल्या दोन प्रतींला पाणी खाचरांत चांगलें तुंबवून राखावें लागतें. तीं तयार होण्यास रोप लागण झाल्यानंतर सुमारे साडेतीन महिने लागतात, परंतु याशिवाय बाकीच्या प्रकारचें भात यापेक्षां आठपंधरा दिवस अगोदर