हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११६ )

 कामाची दुसऱ्या कांहीं कारणांनीं हलाखीच आहे. ती अशी कीं, या कोंकणी जमिनीला दरसाल होरपळून काढल्यावांचून पीकच होण्याची आशा नसते. गुरांच्या शेणखतापेक्षां ह्या भाजून काढण्यानें झालेल्या खताचा शेतकामास फार उपयोग होतो. हें पाहिजे तितके मिळालें नाहीं, ह्मणजे जमिनीला कितीही मेहनत करून पीक केले तरी तींत उत्पन्न चांगलें होत नाहीं, ही निर्विवाद गोष्ट आहे. अशी जमीन भाजून काढण्याची वहिवाट फार दिवसांची असून त्याकरितां सर्व प्रकारचा राब (झाडझाडोरा व पाला) जंगलांतून आणण्याचाही प्रचार पुरातनचाच आहे. परंतु महाबळेश्वर हें हवाशीर ठिकाण ठरविल्यामुळे, याच्या आसपासच्या जंगलासंबंधानें केलेले नियम येथील शेतकरी लोकांना बरेच नडविणारे झाले आहेत. या नियमांप्रमाणें शेतकर्‍यांना फक्त सात प्रकारच्या झुडपांचा राब घेण्याची वहिवाट मर्यादित झाल्यामुळे दिवसेंदिवस शेतकामास राब पुरेशी मिळण्याची फार मुष्कील होत चालली आहे. कारण, सर्व लोकांनीं आदले वर्षी या जंगलांतून विवक्षित प्रकारची राब नेल्यावर पुढले वर्षी