हे पान प्रमाणित केलेले आहे.




महाबळेश्वरीं येणारे लोकांच्या
वेळाचा व्यय.
--------------

 शरीरसमृद्धीस मुख्य कारणें येथील हवा व रमणीय ठिकाणींं फिरणें हीं होत.

 याकरितां पहाटेंस मोठया झुंझुरका सूर्योदयापूर्वी उठण्याचा येथें परिपाठ आहे, व कोंवळे उन्ह पडतें तोंच व्यायाम करून घरीं परत यावे हा विहित मार्ग आहे. परंतु या नियमास उल्लंघणारे पुष्कळ असतात. कारण पांच वाजतां साखर झोंप मोडून थंडीच्या तडाक्यांत उठण्याचा निश्चय सर्वांचे हातून चालत नाहीं. याकरितां उशीरानें उठून व उशीरानें व्यायाम करून परत येणारे लोक फार आढळतात. आणि मुख्यत्वेंकरून आपल्या लोकांमध्यें अशा प्रकारचा आळस पुष्कळ आढळतो. इंग्रज लोकांच्या नियमांत मात्र अंतर होत नाहीं. ते सकाळच्या वेळीं घोडयावर बसून रपेटीस जातात. तथापि पायीं फिरण्याचाही प्रघात