हे पान प्रमाणित केलेले आहे.
( 180 )


शिखरें एखाद्या किल्याच्या कपाटावर चोचीदार लंगरी खिळ्याच्या रांगा असतात त्याप्रमाणें दिसतात. तेव्हां नागवे, बोडके, व मस्तकसहित सर्वांग भादरलेले, जळके, काळे कुळकुळीत, व मधून मधून किंचित् भोरे, अशा प्रकारचे जे हे शैलसमूह दिसतात त्यांचें उग्र व रौद्र रूप पाहून पाहणाराचें हृदय खरोखर भयाभीत व चंचल होऊन दृष्टि स्थिरपणे ठरत नाहीं, व मनांत कल्पना येते कीं, पर्जन्यवृष्टिच्या वेळेस अवज्ञा करून वृष्टि न करणार जे मेघ त्यांना सुळी देण्याकरितां हें एक भयंकर यंत्र तयार केलें आहे कीं काय ? अथवा इंद्रानें पर्वताचे पक्ष कापण्याकरितां या ठिकाणी बर्च्या जमवून ठेविल्या आहेत कीं काय !

या सीटच्या दगडाला लागूनच एक खिडकीच्या कठडयासारखा लहानसा खडपा आहे. याच्या दोन्ही आंगास उंच खडक असून मध्ये हा पातळ पाषाणाचा खडपा लांकडी फळीप्रमाणें पाहून येथें अगदी खिडकीचे कठड्याचा भास होतो. यावर एकदा जाऊन पाहोंंचले ह्मणजे खालच्या खोऱ्याच्या