सारांश, सर्व महाबळेश्वरांतील रमणीय स्थलापेक्षा या ठिकाणींं जो विशेष चमत्कार दृष्टीस पडतो तो खरोखर अवर्णनीय आहे. येथें मेघमंडळास भिडणारे उंच पर्वत, व त्यांच्या पायथ्यासभोंवतीं, कित्येक अगदीं नळीप्रमाणें चिचोळीं असून वरून कड्यानें आच्छादित असल्यामुळे आंत सूर्याचा प्रवेश न होतां, अंधकार व तशांत निबिड छायेनें भरलेलीं अशींं, आणि कित्येक मगराप्रमाणें भयंकर तोंडें वांशीत जाऊन पुढें अफाट मैदानाला मिळतात अशीं, हजारों फूट खोलींचीं खोरीं आहेत. या निरनिराळ्या खोऱ्यांमध्ये पर्वतांतून उत्पन्न होऊन, व अजस्र कड्यांवरून हजारों फूट खाली उडया घालून ज्या नद्या विलक्षण विस्तार पावून देशसमृद्धीस कारण होतात, त्यांचीं पात्रं सर्पाकृति व उन्हाळ्यांत शुष्क आणि जलशून्य दिसत असतात. ज्या कडयांवरून त्यT नद्या उडया टाकितात, त्या कडयांला हजारो वर्षांपासून पडलेले विस्तीर्ण घट्टे दिसतात, तसेच समुद्रतीर व त्यावर असलेले बाळडोंगर सोंगटया
पान:महाबळेश्वर.djvu/220
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१८५ )