घाटमाथा चढत चढत महाबळेश्वरीं श्रोशंकराच्या गळ्यांत माळेप्रमाणें वेष्टण घालण्यास जात आहे कीं काय असें वाटतें ! आपल्या डाव्या आंगांस लहानमोठ्या पर्वतांची अस्ताव्यस्त गर्दी पसरलेली असते. हें पर्वतमंडळ व तसेच आपण उभे राहतों त्या बाजूस व उजवे बाजूस पर्वतराज आहेत ते डोकीं उंच करून वीरश्रीने लढण्यास अर्धरथी एकरथी व महारथी असे उभे ठाकलेले असतात. परंतु सर्वात ठेंगणा तथापि पुराणविख्यात अभिमन्युप्रमाणे वक्राकृति, दुर्धर, अतिरथा जो प्रतापगडचा शैल तो सगळ्या गिरिवीरांस आपल्यापुढें अर्धचंद्राकार व्यूहरचनेनें उभे ठेवून त्यांच्यावर पाहरा करीत आहे कीं काय असा भास होतो. आणि प्राकाररूप वीरभूषणें मस्तकीं परिधान करून, व सुळ्याचे खड्ग हातीं घेऊन, प्रतापगड या नांवानुरूप साक्षात् कृति करण्यास आवेशानें सिद्ध आहे कीं काय असें वाटतें. परंतु महावीरांचीं मनें जितकीं कठोर तितकीच मृदुही असतात. या वचनाप्रमाणे प्रातःकाळीं प्रतापगड किल्ला पाहण्यास
पान:महाबळेश्वर.djvu/225
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९० )