कोंडलेल्या जागेंत पडत असल्यामुळे त्या स्थळाला जी शोभा दिसते, तिचें सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सिडने व एल्फिन्स्टन पाइंटाच्या मधल्या घोडेवाटेवर हा आहे. महाबळेश्वर वाटेनें थोडे लांब गेलें ह्मणजे डावे हातास धोबी फॉल अशी पाटी लावलेली दृष्टीस पडते, तेथून या धबधब्याची वाट फुटते. फक्त पायीं किंवा घोडयावरून जाण्याच्या उपयोगाची ही वाट आहे. धबधब्याचे ठिकाणीं आलें ह्यणजे दोन लंबायमान खडप्याच्या चिचोळ्या जागेंंतून पाणी खालीं आदळत असलेलें दिसतें. भोंवतालीं हिरवीगार रंगाची घनदाट झाडी लागून गेलेली आहे. येथें चोहीकडे सर्व शांतता असून फक्त पाण्याचा मात्र आवाज होत असतो, हें पाहून पुस्तकांतून वाचलेल्या अरण्याच्या देखाव्याचे वर्णनाचा बरोबर मोकबला आहे असें वाटून आनंद होतो. आजूबाजूच्या दाट झाडीतून या धबधब्याला जातांना व तेथें पोंचल्यावर एखादें श्वापद हळूच पुढे येऊन आलिंगन देईल किंवा काय, अशी फार भीति वाटते. वाटेनें फार रहदारी नसल्यामुळे व आजू-
पान:महाबळेश्वर.djvu/242
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २०७ )