होतें, तें हल्लींं मालकमपेठच्या गांवांत सामील झालें आहे. त्या गावांत शुद्ध धनगर लोकांची वस्ती असे. ते नेहमीं पुष्कळ गुरें बाळगून दुधदुभत्यावर आपल्या निर्वाहाची तरतूद करीत. सदरहूप्रमाणेंच जवळच्या खेड्यांतील स्थिति होती. कारण, मुलूख डोंगराळ असल्यामुळे शेतकीस जमीन फार बेताचीच. या डोंगरांत झाडी फारच गर्द असल्यामुळे मांसाहारी व उद्भिज्जाहारी जनावरांना मग काय तोटा ! हीं मांसाहारीं जनावरें कोठे कांहीं भक्ष्य मिळेनासें झालें ह्यणजे मनुष्यवस्तीजवळ येऊन गुरांढोरांना फार त्रास देत. परंतु पुढें सुधारणा होऊन १८५३ सालीं येथील सरकारी जंगलाची हद्द ०५ मैल ठरून मर्यादित झाल्यामुळे येथील लोकांच्या सवयींत पुष्कळ फरक पडला, जंगलांतील गवत मोफत मिळेनासें झाल्यावर धनगर लोकांच्या " गोपालवृत्ती " चा पसारा त्यांना गुंडाळून ठेवावा लागला. त्यावेळीं पुष्कळ व्यापारी येथून व्यापाराकरितां लोणी घेऊन जात, ते अगदीं बंद पडले. तेव्हां उद्धिज्जाहारी जनावरें नैसर्गिक भूमिगत उद्धिज्जोत्पत्तीची-
पान:महाबळेश्वर.djvu/253
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२१८ )