हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२७ )

 बद्दल त्या भक्तांकडून देवाला गाऱ्हाणें घालितात व त्याचा सूड घेण्याचा यत्न करितात. यामुळे सर्व लोक एकमेकाला वचकून असतात. या निरनिराळ्या जातीचा सोयरसंबंध होत नाहीं. हा फक्त जातींतल्या जातींतच होतो. तथापि या सर्व जातींपैकीं उंच जातीच्या मनुष्यानें स्वयंपाक केला असला तर त्यापेक्षां कमी व त्याच्या जातीचे सर्व लोक तों घेऊन जेवण करितात. कोळी, कुणबी, धनगर या सर्व जातींचे लोक चांगले धट्टेकट्टे असतात. त्यांची कुटुंबेही फार वाढतात. ह्या जातींचीं माणसें लौकर थकून मरत नाहींत.

 हिंदु धर्म व मुसलमानी धर्म यांचें मिश्रण होऊन धावड लोकांचा धर्म बनला आहे. हे सर्व मांसाहारी असून सांपडेल तेव्हां पारध करितात. यांचें नेहमींचें खाणें धान्याचें आहे. तें ते अस्सल प्रतीचें आणून चैनीनें खातात. ही जात फार कष्टाळु आहे, आणि नेहमीं मोलमजूरी करून उपजीविका चालविते. या लोकांचे घरीं हिंदूचे देवही असतात. व त्या देवांचे ते हिंदू धर्माप्रमाणें पूजन करितात. हिंदूंचे