नरपती हयपती । गजपती गडपती |
पुरंधर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥ ३ ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत। वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ ४ ॥
आचारशील विचारशील | दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणें सुशील । सर्वाठायीं ॥ ५ ॥
धीर उदार सुंदर । शूर क्रियेशीं तत्पर ।
सावधपणेशीं नृपवर । तुच्छ केले ॥ ६ ॥
तीर्थें क्षेत्रें तों मोडिलीं । ब्राह्मण स्थानें बिघडलीं ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥ ७ ॥
देवधर्म गोब्राम्हण । करावयासी रक्षण ।
हृदयस्थ जाहला नारायण । प्रेरणा केली ॥ ८ ॥
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठाई॥ ९ ॥
या भूमंडळांचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं |
महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुह्माकरितां ॥ १० ॥
आणखी कांहीं धर्म चालती । श्रीमंत होऊनि कित्येक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्तिं । विश्वीं विस्तारिलीं ॥११॥
पान:महाबळेश्वर.djvu/316
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८१ )