हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३०९ )


लेडी रे स्कूल.

 मालकमपठेची वस्ती वाढत वाढत इतकी वाढली कीं, ती पेठ वसविल्यापासून सुमारें ३० वर्षानीं ह्मणजे सन १८६४ सालीं येथें मुलांची शाळा असावी अशी अवश्यकता वाटून ही शाळा स्थापन झाली. या वेळीं या शाळेला सरकारी इमारत होती, परंतु ती लहान असलेमुळे त्या इमारतीची विक्री करून पुढें सन १८८६ सालीं म्युनिसिपाल खर्चातून शाळेकरितां ही नवीन इमारत बांधण्यांत आली. या संधीस मुंबईचे गव्हरनर नामदार लार्ड रे साहेब यांची स्वारी येथें आलेली असल्यामुळे, या नव्या इमारतीचा प्रवेशविधि त्यांच्याकडून करवून या इमारतीस त्यांच्या प्रियपत्नीचें नांव "लेडी रे स्कूल" असें देण्यांत आलें, त्या नांवानें ही शाळा अद्यापेि प्रसिद्ध आहे.

 या शाळेत मराठी पांच इयत्तांपर्यंत अभ्यास चालतो. या शाळेत पाऊस काळांत, जरी या वेळीं येथें कोणी बाहेरील गृहस्थ राहत नाहीत, तरी मुलांची संख्या १५० पर्यंत असते. ही संख्या, हिंवाळ्यांत