हे पान प्रमाणित केलेले आहे.
नेटिव जनरल लायब्ररी.
--------------
हल्लींची लायब्ररीची नवीन इमारत ज्या जागीं बांधण्यांत आलेली दिसते, त्याच ठिकाणीं मालकमपेठ नेटिव लायब्ररी नांवाची अगदीं नादुरस्त झालेली एक जुनी इमारत होती. सन १८७२ सालीं सरकाराकडून वर्षाचे ७१२ रुपये प्रमाणें जुजबी भुईभाडे कायमचें देऊन ही जुनी इमारत लायब्ररीच्या त्या वेळच्या म्यानेजिंग कमिटीनें बांधली होती. ती इमारत साधारण रीतीची असून पुष्कळ दिवसांची जीर्ण असल्यामुळे अगदी निरूपयेागी झाली होती. यामुळे येथें वर्तमानपत्रे वाचीत बसणाऱ्या पुष्कळ एतद्देशीय थोर गृहस्थांच्या मनांची सुप्रसन्नता नसे. म्हणून ही नवी करण्यासाठीं दानशूर शेट बोमनजी दिनशा पेटिट यांजकडे या सार्वजनिक कामास मदत मागितली. तेव्हां त्यांनीं इमारत नवीन बांधण्याचा सर्व खर्च आपण