देतों असें मनापासून कबूल केलें, आणि आपलें नांव इमारतीस द्यावें अशी अट घातली. तेव्हां पुढारी मंडळींनीं असें करण्याबद्दल सरकारची मंजुरी आणवून त्यांचे ह्मणण्याप्रमाणें व्यवस्था केली, आणि त्यांजकडून ही इमारत तयार करून घेतली. यास नुसत्या इमारतीच्या कामास सुमारें १५,००० रुपये लागून कपौंडचें लोखंडी रेलिंग व गेटच्या सुशोभित झडपा यांस आणखी २००० रुपये लागले. याप्रमाणें सर्वांत मोठी मदत यांजकडून झाल्यामुळे प्रवेशविधीच्या वेळीं नाम० गव्हरनर साहेबांनीं सुद्धां यांच्या दातृत्वाची फारच प्रशंसा केली. असा आमच्या लोकांवर त्यांनीं चिरकाळचा उपकार करून ठेविला. पुढेंहीं संस्था चालविण्यासंबंधानें लागणाऱ्या खर्चाची तरतूद ज्या रकमेच्या व्याजांतून व्हावयाची असे ठराविलें आहे, त्या रकमेच्या भरतीसही या उदार पेटिट घराण्यांतून १००० रुपयांची रकम कबूल करण्यांत आली आहे, बाकी कायम देणग्या व वर्गणी मिळून सुमारें ९५०० रुपयांच्या व्याजाचें उत्पन्न लायब्ररीचे खर्चाकरितां केलें आहे.
पान:महाबळेश्वर.djvu/354
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१९ )