हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३ )
प्राणी तर येथें दिवसा ढवळ्या 'आ' करून खाण्यास येण्यास अनमान करीत नव्हते. येथील झाडी इतकी किर्र होती कीं कियेक ठिकाणी तर बारा बारा महिने सूर्यदर्शनसुद्धां होणें कठीण असे. अशा ठिकाणाला येत येत ७५ वर्षांनीं आजची उन्नत स्थिति प्राप्त झाली आणि मधलें नहर हें नांव लयास जाऊन अगदीं पुरातनचे महाबळेश्वर हें नांव पुन: स्थापित झालें.
-------------
मूळ महाबळेश्वर श्री शंकराचें
स्थान व पंचगंगा.
-------------
शिरस्योर्ध्वंं मौलिर्नयनयुगुलं भाति विमलं
ललाटे कस्तूरीतिलकमपि कृष्णे स्मितमुखी ।
चतुर्हस्ते पद्मं वरदमभयं शंखवलयं
कटौ सूक्ष्मं पीतांबरमपि च वंदे तव पदं ॥१॥
जनानां स्नातानां वृजिनहरणोत्धूलितवपुर्न
वै लेभेऽभ्यंगावसरमपि वा पुण्यसलिलं ।