ह्मणून त्यांस दुसरा वर्ग माजिस्त्रेटचा अधिकार फौजदारी कामासंबंधानेही दिला आहे. येथें पोलीस आफिसर असून शिपाई वगैरे मिळून १५ लोक सुमारें असतात. हें स्थळ महाबळेश्वर सुपरिंटेंडेटचे देखरेखीखालीं असतें. लोकांच्या खाजगी बंगल्याशिवाय सार्वजनिक उपयोगी अशा इमारती आहेत त्या, सुपरिंटेंडटचें आफिस, रहदारी बंगला, हॉटेल, लायब्ररी, पोष्ट आणि तारआफिस, हिंदूची सरकारी मराठी शाळा, यहुदि व साहेब लोकांच्या मुलांची सरकारी मदत मिळालेली इंग्रजी शाळा, दवाखाना, माकेंट आणि ३० नोकरांस राहण्यासाठी कोठडया वगैरे इमारती आहत. पैकी ३ मात्र सरकारी पैशानें बांधिलेल्या आहेत. येथील रहदारी बंगला हवा तेवढा मोठा असून त्याला स्वयंपाकघर, नोकर लोकांच्या व पाकनिष्पत्ति करणाऱ्यांच्या कोठडया आणि तबेला वगैरे इमारती जोडल्या आहेत. या बंगल्यांत महाबळेश्वरचे सफरीस निघालेले साहेब लोक मुक्काम करितात; किंवा कोणी पारशी किंवा गोरे लोक हॉटेलला
पान:महाबळेश्वर.djvu/383
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३४८ )