हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३५१ )

 पथिकास येथील दुतर्फा कुंपणांच्या पुष्पगुच्छांचा शृंगार पाहून त्याच्या मनास खचीतच समाधान वाटतें. हे फुलांचे झुपके कुंपणावरून इतके दाट असतात कीं ते गुलाबाच्या फुलाच्या मुद्दाम माळा करून पसरल्या प्रमाणें दिसतात. एकेका झुपक्यांत पन्नास पन्नास फुलें दृष्टी पडणें ह्यणजे कांहीं सामान्य गोष्ट नाहीं आणि असे झुपके पाहून मनास सानंद आश्चर्य वाटणें अगदीं साहजिक आहे. सर्व ऋतुकाळीं रम्य दिसून ही सुंदर पांचगणी आगष्ट व सपटंबर महिन्यांत तर सौंदर्याची कमालच करून सोडिते. यावेळीं लहानझुडपे, बटरकप, रानवाटाणा यांनीं रान अगदीं शृंगारून गेलेलें असतें. सपाट जाग्यावर हरळी, मखमाल व इतर प्रकारचें गवत उगवून हिरवागार गालीच्या पसरल्यासारखा दिसतो.

 बाहेरून महाबळेश्वरीं आलेले लोक मे अखेर पावसाळा लागतां लागतां आपुलें सामान पाठवून डांकेच्या जंत्रींत नांवें नोंदून वाहन मिळण्याचा नंबर येईपर्यत गडबडीत गडबड करून येथें उभाउभी येऊन जातील तर त्यांना याही ठिकाणचा मासला कळून