हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १० )



कळून येईलच. या सर्व डोंगरास महाबळेश्वर अशी संज्ञा मिळाली व पांचही पुण्य नद्यांचें पवित्र व मधुर पाणी सर्व डोंगरभर सारखे पसरून राहिलें आहे. अशा करण्यानें देवांनीं त्या महाबळ दैत्याच्या वरप्रदानाची व सावित्रीच्या शापाची पाळणूक केली. परम साध्वी जी सावित्री, तिचा जाज्वल्य शाप-स्त्रीरूपाने जगांत प्रसिद्ध होण्याचा- उगीच लटपटींत नव्हता. त्या प्रमाणे सर्वजण जलप्रवाहरूप धारण करून निरनिराळ्या खोऱ्यांंतून जणूं काय सर्व जगांत नीटपणें प्रसिद्धी व्हावी म्हणून जवळच्या जवळ पश्चिमेकडे न जातां, तिघे देव नदीरूपानें दूरवर पूर्व समुद्राकडे वहात गेले. त्यांतील विष्णू कृष्णा नदीचें नांव स्वीकारून पूर्ववाहिनी नदी बनले. महेश वेण्या नदी रूपानें प्रसिद्धीस आले. व ब्रम्हदेव कुकुद्मति किंवा कोयना नदी होऊन गेले. गायित्री व सावित्री या दोन्ही जातीच्याच स्त्रिया असल्यामुळे त्यांस स्त्रीवाचक नावें निराळी पडली नाहींत. फक्त त्यांच्या नद्या मात्र निरनिराळ्या पश्चिमवाहिनी झाल्या आहेत. कृष्णाबाई वगैरे पंच नद्यांच्या उगमांचें एक व खुद्द महाबळे-