हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )



राहणार नाही. महाबळेश्वरास जाणारे गृहस्थासही पुष्कळ पुस्तकें पाहिल्याशिवाय व स्वतः डोंगरांतून अवघड अवघड ठिकाणी जाऊन ज्या लोकांशी बोलणे देखील कठीण पडतें अशा लोकांशी सहवास केल्याशिवाय ज्या गोष्टींची आणि झाडपाल्यांची माहिती मिळणे अशक्य आहे ती माहिती ह्या पुस्तकापासून अनायासाने मिळणार आहे.

 या पुस्तकाचे सहाय्याने महाबळेश्वर पाहणार आणि त्यावांचून महाबळेश्वर पाहणार ह्याजमध्ये जमीन अस्मानचें अंतर राहणार आहे. ह्याजकरितां हे पुस्तक सर्वांचे आश्रयास पात्र आहे, असें मी मोठ्या संतोषाने म्हणतों.

आबाजी विष्णु काथवटे.



---------------

[नामदार गोपाळ कृष्ण गोखले, बी. ए., फर्ग्युसन कालेजचे प्रोफेसर, लोकल व सुप्रीम लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे मेंबर व पुणे म्युनिसिपालिटीचे प्रेसिडेंट. ]

रा. रा. दत्तो कमलाकर दीक्षित यांनी केलेले “महाबळेश्वरवर्णन." मी वाचून पाहिले. महाबळेश्वरास जाणाऱ्या गृहस्थांस या पुस्तकाचा चांगला उपयोग व्हावा ह्मणून रा० दीक्षित यांनी फार परिश्रम केले आहेत यात शंका नाही. दंतकथा ऐतिहासिक माहिती, पहाण्याची ठिकाणे, राहण्याचे बंगले, तेथे मिळणाऱ्या वनस्पती. वगैरेंबद्दलची माहिती इत्यादि अनेक उपयुक्त व मनोरंजक गोष्टींचा रा दीक्षित