हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९ )



सांबरांच्या खुरांचे स्पष्ट उमटलेले माग व याच जनावरांची ठिकठिकाणी पडलेली विष्टा हीं सहज जातां जातां नजरेस येतात: तेव्हां पोटांत अगदी धस्स होऊन जाऊन पांचावर धारण बसते. पाऊलवाटेनें जाणारास या ब्रह्मारण्यांत यज्ञसमयाचे वेळीं राहण्याकरितां केलेली एक गुहा आहे ती पाहण्यास मिळते. ही चार पांच माणसें बसण्यासारखी मोठी आहे. यज्ञस्थंडिलाची जागा व सावित्रीनें संतापानें आपला कडेलोट करून घेतलेला कडा ही अगदी एकमेकाला लागूनच असलेलीं आर्थरसीटकडे जातांना डावे हातास लागतात. यावरून यज्ञाचेवेळीं सावित्रीची व देवाची चकमक उडाली म्हणून जी हकीकत आहे तिचा मेळ जमतो. हीं स्थळे पाहण्यास जातांना दाट झाडीतून जावें लागतें. या झाडींत दोन प्रहरींसुद्धां सूर्याचें लंबायमान किरण आंत शिरकू शकत नाहींत. या यज्ञस्थंडिलाची जागा अद्यापि ओळखून पाहण्याची कोणाही हिंदुगृहस्थास इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. ती पाहणारे लोकांस येवढीच सूचना आहे, कीं हा यज्ञ होऊन हजारों