हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८ )

 जाळी वगैरे नसल्यामुळे सर्वकाळ अंधार असतो; त्यामुळे या नंदादीपांचा चांगला उपयोग होतो. गाभाऱ्याच्या बाहेरील अंगास शेजघर असून त्या ठिकाणीं काळभैरवाचें स्थान आहे, तेथें दररोज बहुतकरून पुराण वगैरे चालतें; यांचे पलीकडे एका मोठा काळे पाषाणाचा नंदी करून बसविलेला आहे. त्यावरील सभामंडप तांबडे दगडाचा बांधलेला आहे. यावरून तो मात्र अलीकडे केला असावा असें दिसतें. या नंदीचा डावा कान फोडलेला आहे. त्याची हकीकत अशी सांगतात कीं, अवरंगजेब दिल्लीचे मोंगल बादशाहा याचेवेळीं हिंदूंचीं सर्व देवळे फोडून देवांच्या मूर्ती वगैरे नाहिंशा कराव्या, हिंदूचे मुसलमान करावे, वगैरे प्रकार चोहोंकडे चालला होता, ती मूर्तिभंगाची लाट महाबळेश्वरापर्यंत येऊन पोंचली होती. तेव्हां एके वेळी मोंगल देवळांत शिरले आणि त्यांनीं प्रथम नंदीवर प्रहार करून त्याचा कान तोडला. इतकें होतांच देवळांतून मोठमोठे भुंगे निघून, त्यांच्या मागे लागले आणि त्यांस त्यांनीं पुरे पुरे करून सोडिले. हे पाहून या दैवताबद्दल त्यांच्या मनामध्यें