येत असल्यामुळे त्यांच्या आघातापासून उत्पन्न होणारा प्रचंड स्वर कर्णविवरांत एक सारखा भरत असतो व कोठे कोठे गिरणींतील कापसाच्या ढिगासारखी तुषारांची शोभा दिसत असते; उभ्या पावसाळाभर अतोनात पाऊस अंगावर घेऊन शेवाळलेली जांभळीचीं व पिशाचीं झाडें, आपले शरीरांत मावेनासें झालेलें पाणी बाहेर टाकीत आहेत की काय असें वाटतें; व त्या पाण्यांत हात घातला तर तत्क्षणीं ते बधिर होईल, व ते तोंडांत घातले तर अंगावर शहारे येतील इतके पाणी गार असतें. असाच प्रकार पावसाळयांत जो कोणी पुण्याहून मुंबईस गेला असेल त्यास खंडाळयाचे घाटांत आगगाडीतून जात असतांना चांगला दृष्टीस पडतो. तसेंच वेण्या तलावाचे बाजूस जाऊन पाहिलें, तर, तें सरोवर व त्याचे भोंवतालची गर्द झाडी, ही इतकीं रमणीय दिसतात कीं ती पाहिल्यावर पुराणांतरींच्या पंपासरोवराचें स्मरण होतें. नेच्या ( फर्नस ) च्या नुकत्या उगवून आलेल्या झाडांना नुसतीं पानें येऊन वळण आलेलें असतें, तें फारच मौजेचे दिसतें. मैदानावर