बालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचें सुख अनुभवतोंसें वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदीं हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगदीं दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.
मार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यंत फुलें व गवत नाहींशीं होऊन झरे व धबधबे चोहोंकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्यें धुरानें दाट पणा आल्यामुळें देखावे स्पष्ट दिसत नाहींत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाहीं. तथापि या वेळींही टेंकड्या विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटू लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें. मे महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुकें येऊं लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून काही दिसत नाही. रस्त्यावरून चार दोन हातावरील माणसांची चाऊल ऐकू येत नसली तर मनुष्ये आहेत