हे पान प्रमाणित केलेले आहे.





मालकम पेठ ऊर्फ नहर.
---------------

 स्वदेश सोडून परदेशवास करणें कोणास प्रिय आहे? परंतु तोही कालमानानें करावा लागतो, व अशा अवस्थेत होईल तितकं करून परदेशांत राहिल्याचा भास न होईल अशी व्यवस्था करण्याची परकीयांस उत्कट इच्छा असते, आणि ती पूर्ण करण्यास लोभी, कष्टाळू आणि साहसी मनुष्य जिवापाड मेहनत केल्यावांचून राहत नाहीं. हें पुढील मालकम पेटशोधनाच्या हकिकतीवरून दिसून येईल.

 पहिल्यानें सन १८२४ मध्यें जनरल लाडविक साहेब सातारच्या रेसिडेंटचे जागी असतांना येथें आले. ते प्रथम आले; ते सिडने पाईंंटावर येऊन उतरले. त्यावेळीं येथें येणें ह्यणजे आपण होऊन काळाच्या दाढेत प्राणत्याग केल्या दाखलची स्थिति होती. एकतर डोंगर अस्मानपर्यत उंच गेलेले असून त्यावर झाडी इतकी दाट कीं त्यास जणु कांहीं पांघरूण घालून झांकूनच ठेवले