आहेत असा भास होई. अशा ठिकाणीं हिंसक पशूंची गोष्ट काय विचारतां ? त्यांना रात्रंदिवस हवे तिकडे संचार करण्यास सारखेच असल्यामुळे ते जिकडे तिकडे फिरतांना दृष्टीस पडत. वाटांचें तर नांवच काढावयास नको. अशी स्थिती असतां लाडवुईक साहेब काठी टेंकीत टेंकीत जिवाचा धडा करून कसेतरी डोंगरावर येऊन पाहोंचले. सुदैवाची गोष्ट इतकीच कीं डोंगरावरच्या प्रदेशांत निबिड झाडीमधून माथ्यावर येत असतांना, एखाद्या शीघ्रकोपी वनराजाच्या तावडींत सांपडले नाहींत. तथापि त्यांचे जवळ हत्यारपात्यार असतांही दोन दिवसांनी भर दिवसा एका वाघोबानें त्यांचा बराबर असलेला आवडता कुत्रा त्यांच्या समोर उचलून अचानक नेला. बरें झालें. नाहीं तर साहेबांचीच आहुती व्हावयाची. येथील हवा फार उत्तम व स्थळ रमणीय आहे, असें पाहून साहेब बहादुरांनीं ही गोष्ट सर्व लोकांस कळवून सरकारांतही जाहिर केली. पुढे कर्नल ब्रिग साहेब सातारचे रेसिडेंट झाले, त्यांणींं १८२६ साली येथें येऊन एक बंगला बांधिला; आणि सातारच्या