या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ नरहरिकृत [द्रोणपर्व सुखमूर्ती ! ॥११॥ घोर विप्न प्राप्त अनुत्तम । सुखी असो राजा धर्म.' । विगतमानसें पुरुषोत्तम । म्हणे, “अक्षयी तव भ्राता.' ॥ १२ ॥ रथ लोटुनी अतिसत्वरा । येतां मार्ग शिबिरागारा । विव्हळ दशा राजेश्वरा । चमू कैसी । देखिली ? ॥ १३ ॥ षोडैश शृंगारें गोरटी । नसतां कुंकुम, गळसरी कंठीं, । की रत्नवापिका गोमटी । अंबुजगहनविरहित. ॥ १४ ॥ कीं ग्रेहग्रस्त विधूचे चांदणें । ना ते विधवेचे ऋतुशोभन । तैसी सेना पृथानंदने । देखोनी बोले हरीतें. ॥ १५ ॥ म्हणे, अनंता ! कमळाकांता ! गुणातीता ! अव्यक्तव्यक्ता ! । कर्ता, हर्ता, आनंदभरिताः । अच्युत ! दुर्घट दिसे पैं. ॥१६॥अनेक वाद्यदुंदुभीध्वनी । मंगळ घोष नायकों कर्णी । गीत आलापनृत्यांगनी । विवर्जध्वनी दिसे । पैं. ॥ १७ ॥ शंख, सारंग, विणे, वेणू, । करताळिया, अलगुजी, मानू । मृदंग, पणव, चंगघनू, । भाट, भाटिव, नायकों. ॥ १८ ॥ प्रवेशतां सभास्थानीं । बंधुवेष्टित राजश्रेणी । पार्थ देखोनियां नयनीं । अधोमू सूदल्या. ॥ १९ ॥ अर्जुन म्हणे, ‘कासारीं । परिपूर्ण जीवन मुरारी । असतां पांडवमुखकल्हारीं । केवीं म्लानता पावली ? ॥ २० ॥ विवर्णवर्ण किमर्थ तनू ? । हर्षानंद मावळे भानू । शब्दमृगाचे उड्डाण घनू । स्थिर केवी दिसे मैं ॥ ३१ ॥ समस्त भूपरत्नपंक्ती । वेष्टीत बंधु अवनीपती । अभिमन्यहिरा न दिसे व्यक्ती । दिशा शून्य मज वाटे. ॥ २२ ॥ नेणों चक्रव्यूह द्रोणाचार्य । रचिला त्याची भेदनसोय । भ जाणती वय । सौभद्र एक भेदिता. ॥ २३ ॥ वीरश्रियेचा अद्भुत लोट। तगटतां युद्धी भरला घोटू । दुस्तर वीरची प्रभिन घाटू । जो सुरेशा असाध्य. ॥ २४ ॥ वीरी मिळोनी मारिला तनय । हाची गमला अभिप्राय । कणें, द्रोणे, न धरिलें भय । कुमारत्वदशेचे. ॥ २५ ॥ अभिम तान्हें बाळ । गुणी गणना न करवे मोल । सिंहतुल्य विक्रमी बहळ। जाहला वैरिया. ॥ २६ ॥ रूपलावण्यें मारपुतळा । सुवर्णाचा ओतीव गोळा । कोमळतनू फांकती कीळ । बाळसूर्यासारिखे. ॥ २७ ॥ रुचिर हनु, . नासिक, । विशाळ भाळ, प्रसन्न मुख, । पद्ममुख, भुजदंड चोख । परिवार १. चांगले नव्हे असे, फार कठिण. २. मुक्कामाच्या जागीं, तळावर. ३. सोळा शृंगार:- नाहाण, चीर, कंचुकी, कुंकू, काजळ, कर्णफुले, हार, मोतीं, वेणी, पैंजण, चंदनी उदी, के पट्टा, तोडे, विडा, वांगड्या व चतुरता. ४. कमलवनहीन. ५. राहूनें ग्रासलेल्या. ६. स्तति ७. धर्मराजरूपी सरोवरांत. ८. पांडवांच्या मुखकमलांचे ठायीं. ९. न जाणों, असे तर नसेल ना ? १०. युक्ति, उपाय. ११. मोठमोठे, श्रेष्ठ, १२. मोठा, फार. १३. प्रकाश, तेज,