या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ अध्याय महाभारत. १४९ आह्मां क्षत्रियां ।। ३२ ॥ माझा पुरुषार्थ स्फुरिलो वदनीं । तो यथार्थ साच, चक्रपाणी । कौरवी सेना विभांडीन रणीं । जेवीं गरुड सपते. ॥ ३३ ॥ साह्य होऊनी धनंजया । जयद्रथ धाडीन यमालया । पार्थविक्रमाची अगम्य क्रिया । चिंता केवीं मानसीं ? ॥ ३४ ॥ सुरांसहित सुरेश्वर । यक्ष, राक्षस, दानववीर, । उरगदैत्यादि नृपवर । मिनैतां पार्थ जयश्री. ॥ ३५ ॥ जेवीं वना धडकतां शान । त्यास आडवों शके तृण ? । कीं सैयांतीं लोटतां वारिधी जाण । काष्ठपाषाण थोकिँती ? ॥ ३६॥ ना ते संवर्तकपर्जन्यधारा । अल्पवातें वितळती? वीरा! । कीं कल्पांतसूर्य तपतां, शौर्या । पर्णझोंपडी साहिजे ? ॥ ३७॥ तयापरी क्षोभावर्ती । कोण आवरी पार्थाप्रती है । जाली जयद्रथाची शांती । निश्चय मानीं, नरेंद्रा! ॥ ३८ ॥ तथापि तवाज्ञा प्रमाण । शिरसा वंदोनी करी गमन । परी आड रिघे पार्थवचन । परिहारिलें पाहिजे. ॥ ३९ ॥ ऐकत असतां सर्व सेना । जातां पार्थ सैंधवहनना। मातें बोलिला, “विचक्षणा! । यतें धर्मा रक्षिजे. ॥ ४० ॥ गुरुवर्य उदित धर्मग्रणीं । सदा जपे युद्धआयनी । संधी पाहे अनुदिनीं यत्नीं । जेवीं चोर धनाते. ॥ ४१ ॥ सर्वास्त्रभेदी द्रोणाचार्य । काळविखारी भूपतिवर्य । मिनले, अनर्थी करिती सोय । क्षणी धर्मा न विसंबे. ॥ ४२ ॥ सात्वता ! मसी न करी चिंता । जयद्रथ वधीन सूर्य असतां । मम नेमाची वृद्धि ताता!। भंगों नेणे परमेष्ठी. ।। ४३ ॥ तुझा भरंवसा निजमानसीं । मी जातसे संग्रामासी । खचतां आकाश रोधिसी, यासी । द्रोणकेर्वी कायसा ? ।। ४४ ॥ माझा सारथी रमारमण । मारजनक, मधुसूदन । अच्युत, अनंत, अरिमर्दन । उग्रविक्रम, पुरुषार्थी. ॥ ४५ ॥ विष्णु, जिष्णु, इंदिराधव, । गोविंद, गोपाळ हरि, केशव, । मुकुंद, मुरारी, तैरक मैंव । भक्तवत्सल कृपाळू ॥ ४६॥ असतां, चराचर सर्व लया- । क्षया नेईन यादवराया! । गांडीव स्फुरितां विजयी बाह्या । काळ दचके मानसीं. ॥ ४७ ॥ परी एक चिंता मानसीं मज । अॅविप्न असो का धर्मराज । तुझ्या बळाचा मानोनी स्फुज । मी निर्भर । १. उच्चारिला, वर्णिला. २. सप व राक्षसादि. ३. एकत्र मिळाले तरी. ४. अग्नि. ५. प्रळयकाळीं. ६. समुद्र. ७. थांबवून धरू शकतील काय ? ८. संवर्तक=प्रळयकाळचे मेघ. ९. तेजास, सामर्थ्यास (उष्णतेस). १०. ज्ञात्या (धर्मा). ११. तयार, तत्पर. १२. धर्मराजास धरण्याविषयी (अध्याय १११।१४). १३. काळसर्प. १४. अटकाव करिशी, आंवरून धरिशी. १५. द्रोणाचार्यांची पर्वा.१६ संसारांत संरक्षण करणारा. १७.विघ्रहित, कुशल, १८, अभिमान. १९. मोठ्या आनंदाने.