या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ अध्याय] महाभारत. १५१ सजिला दृढ विषद् । सिंहध्वजे साजिरा. ॥ ६३ ॥ धौतपताका रौप्यवर्णी । विजूमानी तळपती गगनीं । शोभायमान रत्नखाणी । रुक्मस्यंदन दृढत्वे. ॥ ६४ ॥ कीं तो बालार्क पातला तळा । ना तो नवरत्नकीळेचा गोळा । कीं तो फणींद्रमस्तकींचा मेळा । किंवा ज्वाळा वन्हीच्या. ॥ ६५ ।। ऐसा यंदन शोभायमान । घंटा, किंकिणी, माळा सघन । वैडूर्यकळस नक्षत्रमान । चहूं दिशा झळकती. ॥ ६६ ॥ कुलीन वाजी उच्चैःश्रवासरी । सदृढ वेग श्वसनपरी । हेममाळाभूषित कुसरी । विचित्ररंगी चित्रिले. ॥ ६७ ।। कुरवाळोनी जुतिले रथीं । शस्त्रसामादि भरली पुरती । सज्जोनी पातला सात्यकीप्रती । जेवीं मातली इंद्रातें. ॥ ६८ ॥ आरोहण करी ते काळीं ।। द्विजीं वोपिल्या पुष्पांजुळी । येरीं दूर्वांकुर सिंचोनी मौळीं । लाह्या सुमनें वर्षली. ॥ ६९ ॥ मंगळघोष स्वस्तिवाचन । भूषीत सुवा[सनी] नीराजन । भाटीव पढती बंदीजन । अनेक वाद्ये तर्जलीं ॥७०।। सात्वतें धर्म कृतांजळी । मस्तक न्यासिला पादयुगळीं । येरें आलिंगोनी हृदयकमळीं । अवघ्राणिलें मौळते. ॥ ७१ ॥ घेवोनी आज्ञा रहंवरयानीं । बैसे, स्मरूनियां शाईपाणी । ‘जय, जय, शब्द मंगळध्वनी । कुंजरभेरी तर्जली. ॥ ७२ ॥ विलोकोनी भीमसेनाते । सायकी बोले प्रसन्न चित्तें । म्हणे ‘बा! धर्मराजाते । वीरविक्रमा रक्षिजे. ॥ ७३ ॥ तव बळाची अमोघ शक्ती । जाणोनी जातसे युद्धाप्रती । सेना विभांडूनी हातोहातीं । उभय कृष्णा वंदीन.' ॥ ७४ ॥ भीम वदे उदित वाचा । “कायसा प्रताप गुरूचा ? । स्वस्थ जाई जेथें विश्वाचा । मायबाप श्रीकृष्ण. ॥ ७५ ॥ श्रीनिवास, श्रीधर, हरी, । शौरी, मुरारी, नरकेसरी, । राजमर्दन, दानवारी; । जयाशा हारी केवीं पां? ॥ ७६ ॥ क्षेम । जावोनी सैंधवशीस । छेदिले पाहिजे सावकाश । कुशळ येवोनी नराधीश । धर्मराजा बंदिजे.' ॥ ७७ ॥ “तथास्तु' वदोनी सात्यकी । रथ लोटला सेनामुखीं । जैसा मृगेंद्र मृगगणा तिखीं । सरके भारी ज्यापरी. ॥ ७८ ॥ | १. नवरत्नांच्या तेजाचा. नवरलें:-माणिक, मौक्तिक, प्रवाल, मरकत, पुष्कराज, वज्र, नील, गोमेद व वैडूर्य. २. भेळा=गोळा, मणी. ३. समुद्रमंथनसमयीं चौदा रले निघालीं त्यांपैकी एक. ह्या घोड्याचे कान नेहमी उभे राहत असत म्हणून यास ‘उच्चैःश्रवा' असे म्हणतात. ४. वायूप्रमाणे. ५. हत्यारांची सामग्री, साहित्य. ६. द्विजांनीं. ७. स्तुतिपाठ. ८, वाजविलीं, कोकलीं. ९. हुंगिलें. १०. मौळ=डोके, मस्तक. डोकें हुंगणे हे प्रीतीचे लक्षण आहे. 'शिरस्याचा गुरुजनस्यापत्येषु वात्सल्यद्योतकम्' (मालतीमाधव-अंक ४ टीका). ११. ताबडतोब. १२. नरश्रेष्ठ (अर्जुन).