२३६ नरहरिकृत [द्रोणपर्व स्तता लोळती, नरशार्दूळा! । माळा गळां मुंडांच्या. ॥ ११० ।। कनकध्वज, भग्न रथ, । पताका, छत्र, असंख्यात । भूमी लोळती प्रकाशवंत ।। जाणों तारा नभःपुटीं. ॥ १११ ॥ वसंत काळींचा भास्कर । तैसा प्रदीप्त रविकुमर । शरासनीं अढळ कर । वीरधडे रिचवतो. ॥ ११२ ॥ सेनामेळीं किलकिलाट । पळतां वीरां न सुचे वाट । सेनापती होवोनी भ्रष्ट । माघारती शरमारी. ॥ ११३ ।। धार्मिक धर्म धर्मात्मा । पाहोनी चमूचा निर्जीवात्मा । हृदी कळवळोनी, राजोत्तमा ! । बोलता जाहला पार्थाते. ॥ ११४ ॥ म्हणे, ‘फाल्गुना ! पंचानना ! । वीरवर्या ! बळवर्धना ! । धनुर्धरा ! वीरमंडणा ! । अजिंक्य नरांसुरांतें. ॥ ११५ ॥ तुझ्या युद्धाचे लाघवमान । सहस्रनयन डोलची मान । सुर, सिद्ध, यक्ष, गंधर्वगण । कीर्ति कीर्तनीं कीर्तिती. ॥ ११६॥ ऐसिया प्रतापिया सूर्या! । तव वाहिनी भयाची छाया । हेची आश्चर्य गर्ने हृदया । वारंवार मज; ताता ! ॥ ११७ ॥ वन्हीस वोळंबाची भरणी? । खगेंद्रा फणीची जाचणी ? । उष्णे विव्हळ तारामणी ? । मुँगांबु गजें बुडिजे ? ।। ११८॥ तयापरी तुझी सेना । अर्दित रणी, नरमंडणा! । रणसागरीं तिमिगिलैमाना । वैकैर्तनू विचरतू. ॥ ११९॥ वीर वीर खिळिले बाणीं । कोण्हा न करवं उठावणी । कोस एक बाणभरणी । धडकोनी वीर पाडीत. ॥ १२० ॥ लघुलँक्ष भेदोनी वीर । खंडुनी शरें धरेवर । गजाश्वरथीकळेवर । दाटतां वाटा खुटल्या. ॥ १२१ ॥ तरी तू आजी समरांगणीं। कर्णास वसवीं काळसदनीं ।। वीरपुरुषार्थ स्फुरीं वदनीं । विश्वाचिया नरवर्या ! ॥ १२२ ॥ तुवां काळखंज। वधिला रणीं । निवातकवच मर्दिले बाणीं । त्याची प्रचीत दावी नयनीं । निर्दाळोनी कणते. ॥ १२३ । धर्मवाग्वात सुसाटे । पार्थक्रोधाग्नी प्रज्वळे नेटें । कर्णशक्तिद्रुमाची थाटे । भस्म करू भावितू. ॥ १२४ ॥ विलाका नेत्रीं घनसांवळा । कोटिकंदर्पलावण्यकीळा । सहस्र शशीच्या एकत्र कळा । मुखावरुनी सांडिजे. ॥ १२५ ।। मुकुट, कुंडलें, वनमाळा । आयुधयुक्त भुजा सरळा । त्रिवळी उदर, नाभिकमळा । कमळोद्भव जे ठाई. ॥ १२६ । कास कासिला पाटोळा । जाणों विजांचा मिनला मेळा । पदपद्म अतयंकळा । कमळा तेथे लुब्धली. ॥ १२७॥ सकळ लावण्याचा गाभा । ज्याचेनि त्रिजग। १. वाळवीची, उधईची. २. त्रास, भय. ३. चंद्र. ४. मृगजळांत. ५. तिमिंगल=तिमि नाम । माशास गिळणारा फार मोठा मासा. ६. कर्ण. ७. निशाण (नेम) मारण्याचे कौशल्य. ८. प्रेत९. धर्माचे भाषण हाच वायु. १०, कणची शक्ति हीच झाडांची रांग. ११. ओवाळून टाकाव्या १२. पाटाव, पीतांबर.
पान:महाभारत.pdf/193
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही