या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व नरहरीची आणखी पवें उपलब्ध झाल्यास, त्यांत प्रकृत लेखकास आनंदच वाटणार आहे. पण आज मितीस तरी कर्णपर्वापुढील नरहरीचीं पवें उपलब्ध नसल्यामुळे, वरील विधानास बाध येत नाहीं. । | ४. ह्या पर्वाच्या पहिल्या तीस अध्यायांचे संशोधनाचे काम ती० कै० वा० दा० ओक यांचे संग्रहीं असलेल्या एकाच प्रतीवर अवलंबून राहावे लागल्यामुळे, त्यांत बरीच दोषस्थळे राहिली होती. पण अक्कलकोट येथील आमचे हितेच्छु रा० रा० विनायक मल्हार सरदेसाई यांनी एक पोथी मोठ्या प्रयासाने मिळवून पाठविल्यामुळे, अशा सर्व स्थळांची दुरुस्ती परिशिष्टांत करितां आली, याबद्दल आह्मी रा० सरदेसाई यांचे फार आभारी आहों. ही पोथी बरीच शुद्ध व वळणदार अक्षराने लिहिलेली असून, हिच्या शेवटी पुढील दोन ओंव्या आढळतातः-- भारतकथा अतिगहन । लेखन केल्या दिव्य निरोपण, ।। हृदयीं चिंतोनी सिंहवदन, । दास नरहरी साक्षेप. ॥ श्रीनृसिंहराजनगरी, । तेथील ‘कणक' नामाधिकारी, ।। नारायणसुत निर्धारीं । केरजगी ग्रामीं वसतसे. ॥ त्या ओंव्यांखेरीज ह्या पर्वाचे शेवटीं “हे पुस्तक सदाशिव माधवराव सुभेदार, परगणे अक्कलकोट, [ हिजरी] सन १२१४ वशाख मास शुद्ध १४ समाप्त असा उल्लेख आहे. नरहरीने हे पर्व शके १६९० त रचिले असा ह्या पर्वाचे शेवटीं स्पष्ट उल्लेख केला आहे, व लेखकाने ते शके १७०८ त ह्मणजे नरहरीने ते रचिल्यानंतर सुमारे १८ वर्षांनी उतरून घेतले. यावरून हा कवि आपल्या हयातीत आपल्या प्रांतांत बराच प्रसिद्ध व लोकमान्य होता, असे अनुमान करावयास हरकत दिसत नाहीं. । । ५. सरतेशेवटी 'काव्यसंग्रहा'चे चालक रा० रा० बाळकृष्ण अनंत भिडे, बी. ए. व मालक श्री. शेट तुकाराम जावजी जे. पी., यांनी ही माझी अल्पसेवा मान्य केली, हे त्यांचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. तसेच रा० विनायकराव सरदेसाई यांनी ह्या पर्वाची एक हस्तलिखित प्रत मिळवून दिली व माझे मित्र रा० रा० नीळकंठ बळबंत भवाळकर, बी. ए., ( नागपुर ), व दामोदर रामकृष्ण बापट, बी. ए., ( नासिक ), यांनी हे काम करण्याचे काम वारंवार प्रोत्साहन देऊन, उपयुक्त सूचना केल्या, याबद्दल मी त्यांचाही फार उतराई आहे. नार्मलस्कूल, नागपुर, । आगष्ट १९०७. दा० के० ओक, १ नरसोबाची वाडी, २ ही गांव धारवाड जिल्ह्यांत आहे.