पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तीनाहीसा करून दोघांमध्ये थेट करार करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतनदारांकडून होणाऱ्या लुटीला आळा बसला.
 सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्तीनंतर बडोद्यातील सारावसलीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. ससं ्थानातील जमिनीचा सर्व्हे करून प्रतवारीनुसार शेतकऱ्यांकडून सारावसलीस प्रारंभ करण्यात आला. देवस्थान आणि धार्मिक ससं ्थांना बडोदा सरकारच्या वतीने मोफत देण्यात आलेल्या जमिनींना बारखळी जमीन म्हणून ओळखले जाई. या जमिनींचे सर्व्हेक्षण करून त्या जमिनींवर सारा आकारण्यास सरुु वात करत सयाजीरावांनी शिवाजी महाराजांच्या जमीन महसलधोरणाचा विकास केला.
 याचबरोबर सयाजीरावांनी बडोदा संस्थानात शेतीच्या विकासासाठी अनेकविध प्रयत्न के ले. कृषी उत्पादन वाढीसाठी शेतीला वेळेवर पाणीपुरवठा करणे गरजेचे असते. शेतीची ही गरज ओळखून सयाजीरावांनी शेतीस वेळेत व अखंड पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९२९ मध्ये सहकारी पॉवर पंप ससं ्थांची स्थापना के ली. या पॉवर पंप ससं ्थांनी सभासदांबरोबरच इतर खेडूतांना शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला. याचबरोबर शेतीला शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत बडोद्यात समु ारे नवीन १२,००० विहिरी बांधल्या. १९३९-४० मध्ये बडोदा ससं ्थानात ७१,११५ पक्क्या व १७,०१८

कच्च्या विहिरी अस्तित्वात होत्या. दुष्काळ किंवा पुरासारख्या

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / १०