पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सकटात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या चारा सकटाला तोंड द्यावे लागू नये यासाठी सयाजीरावांनी १९२३-२४ मध्ये ३६ पशुखाद्य साठवणूक सहकारी ससं ्थांची निर्मिती के ली.
 शेतकऱ्यांमधील निरक्षरता हे त्यांच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे हे ओळखून सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत बडोद्यातील शेतकऱ्यांना कृषिविषयक अद्ययावत ज्ञान देण्याचा सातत्याने प्रयत्न के ला. शेतीसबं ंधीचे आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी सयाजीरावांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने शिष्यवत्तीदेऊन परदेशात पाठवले. खासेराव जाधव यांनी इगं ्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले. बडोद्यात परतल्यानंतर सयाजीरावांच्या प्रेरणेने खासेरावांनी शेतीमध्ये अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले. सयाजीरावांनी १८९७ मध्ये खासेरावांच्याच नेतृत्वाखाली बडोद्यातील स्वतंत्र कृषी खात्याची स्थापना के ली.
 सयाजीरावांनी ऑक्टोबर १९१९ मध्ये खासेरावांप्रमाणेच उच्च शिक्षणसाठी इगं ्लंडला पाठवलेल्या रामचंद्रराव माने- पाटील यांनी युरोपातील डेन्मार्क , स्वीडन, जर्मनी, नॉर्वे इ. देशांचा प्रवास करून तेथील शेतीची प्रगती, जमीन महसल पद्धती इ. चे सखोल ज्ञान मिळवले. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून घेत सयाजीरावांनी माने-पाटलांच्या नेतृत्वाखाली ६४३

खेड्यातील ३३,५६४ बिघे जमीन लागवडीखाली आणली. कृषी

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते /११