पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातीय समानतेचा अनोखा आदर्श प्रस्थापित के ला.पाचाड येथील जिजाबाईच्यराजवाड्याच्या सूरक्षेची जबाबदारी महार जातीतील लोकांवर सोपवण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाची स्तुती करताना इतिहासकार काफीखान लिहितो, “हा शिवाजी आपल्या सैन्यासही मशिदी, कुराण व बायबल यांचा अपमान कधीही करू देत नसे. मालमत्तेची जाळपोळ व लूट करताना जर त्याला कुराण किंवा बायबल आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेई व आपल्या नोकरवर्गातील मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्मीयांना देत असे.’’
 शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वधर्म समभावाचे तत्त्व आपल्या ससं ्थानात रुजवतानाच सयाजीरावांनी तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या अधिष्ठानावर आधारित धर्मसुधारणेचा अनोखा कार्यक्रम विकसित के ला. संस्थानातील प्रजेला धर्म आणि आचार यासबं ंधीचे विचारस्वातंत्र्य असावे व परधर्माचा स्वीकार के ल्याने त्यांच्या विशिष्ट हक्कांवर बाधा येऊ नये या हेतूने सन १९०१ मध्ये धार्मिक स्वातंत्र्य निबंध हा कायदा पास के ला. या कायद्यात कोणत्याही व्यक्तीला त्याने स्वतः प्राप्त के लेल्या हक्कांवर धर्मांतराने किंवा जाती बहिष्काराने बाधा येऊ नये हे या कायद्याचे मुख्य तत्त्व होते. त्याचबरोबर धर्मांतर के ल्याची बाब नोंदणी कामदाराकडे पूर्वसचना देऊन नोंदविण्याची व धर्मांतर

करणारा व्यक्ती ते करण्यापूर्वी काही मुदतीपर्यंत या राज्यात

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / १६